ETV Bharat / bharat

Today Horoscope : सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा राशीभविष्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 6:37 AM IST

Etv Bharat
Etv Bharat

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला आणि कशी मिळेल? चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट दैनिक कुंडलीत जाणून घेऊ....

मेष : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या मंगल प्रसंगात सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी व कुटुंबात मतभेद होतील.

वृषभ : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये. आपल्या खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मिथुन : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन व वाहन सुख मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल.

कर्क : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आपल्या आधीन असणार्‍या व्यक्ती व सहकारी ह्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रकृती उत्तम राहील.

सिंह : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल.

कन्या : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील. स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घर, वाहनाच्या खरेदी - विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. पाण्या पासून धोका संभवतो.

तूळ : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आज शारीरिक व मानसिक स्वस्थता अनुभवू शकाल.

वृश्चिक : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार व सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. धनलाभ होईल. कौटुंबिक प्रश्न सहजगत्या सोडवाल. विद्यार्थ्यांना हमखास यश मिळेल.

धनू : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी राहील. मान - मरातब वाढेल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल.

मकर : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. आरोग्याची तक्रार राहील. एखादी दुर्घटना संभवते. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. परोपकारी कार्यावर पैसा खर्च होईल.

कुंभ : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

मीन : 24 सप्टेंबर, 2023 रविवारी धनु राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ व वृद्धी होईल. पित्याकडून लाभ होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आपली मान - प्रतिष्ठा उंचावेल.

हेही वाचा - Today Love Rashi : प्रेम, वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस कसा राहील? वाचा लव्हराशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.