ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींचे व्यवसायाच्या विकासाबरोबरच उत्पन्न वाढेल; वाचा राशीभविष्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 1:30 AM IST

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 05 नोव्हेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

मेष : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ व शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्त्री वर्गापासून जपून राहावे लागेल.

वृषभ : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास व सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

मिथुन : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. विद्यार्जनाच्या दृष्टीने विद्यार्थांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्नेही व मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल.

कर्क : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन व बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. धनलाभ होईल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.

सिंह : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने आपणास शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद - विवादामुळे भांडण निर्माण होईल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सावध राहावे. उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक होईल. कोणाचे गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्या.

कन्या : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार - व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख - शांती लाभेल. पत्नी, संतती, वडीलधारी यांचेकडून लाभ होईल. मित्रांसोबत रम्य पर्यटन कराल. स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील. संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील.

तूळ : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कामाची स्तुती होऊन प्रेरणा सुद्धा मिळेल. सहकारी सहकार्य करतील. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.

वृश्चिक : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी - व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद टाळा. परदेश गमनाच्या संधी येतील. परदेशात वास्तव्यास असणार्‍या नातलगां कडून आनंददायी बातम्या मिळतील. संततीविषयक चिंता राहील.

धनू : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.

मकर : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. व्यवसाय वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाची शक्यता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल.

कुंभ : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.आपले विचार व व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. नोकराकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. कामासाठी पैसा खर्च होईल. विरोधक व प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

मीन : 05 नोव्हेंबर 2023 रविवारच्या दिवशी आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून आपण साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा व रसिकता राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे. विद्यार्थी अभ्यासात कौशल्य दाखवतील. मानसिक संतुलन व बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

  1. Today Love Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाची शक्यता; वाचा लव्हराशी
  2. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक असेल; वाचा राशीभविष्य
  3. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.