ETV Bharat / bharat

सीमावादाच्या घटनेनंतर आसामने जाहीर केला राजकीय दुखवटा; मृताच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत

author img

By

Published : Jul 27, 2021, 4:08 PM IST

आसाम आणि मिझोरममधील सीमावादात अचानक हिंसाचार झाला. या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पोलीस अधीक्षकांसह 80 जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांच्याशी चर्चा केली.

राजकीय दुखवटा
राजकीय दुखवटा

गुवाहाटी - आसाम सरकारने मिझोरमबरोबरील सीमा वादानंतर तीन दिवस राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. आसाम- मिझोरममधील सीमावादात मंगळवारी पाच पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये राजकीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकाविण्यात येत आहे. दुखवट्यामुळे राज्यात सार्वजनिक मनोरजंनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार नाहीत.

आसाम आणि मिझोरममधील सीमावादात अचानक हिंसाचार झाला. या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पोलीस अधीक्षकांसह 80 जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांच्याशी चर्चा केली. दोन्ही राज्यांनी सीमावादावर शांतीने मार्ग काढण्याचे गृहमंत्र्यांनी आवाहन केले.

सीमावादात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याची आसाम सरकारने घोषणा केली आहे. तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाणार आहे. सरकारने जखमी पोलीस अधिक्षकांना उपचारासाठी मुंबईला पाठविले आहे.

हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष मुलाखत - अभिनेता श्रेयस तळपदे

दोन पक्षांमधील नव्हे राज्यांतील सीमावाद-

आसाम- मिझोरम सीमावर मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की ते आरक्षित वन क्षेत्र आहे. सॅटेलाईट इमेजिंगच्या मदतीने आपण अतिक्रमण झाल्याचे पाहू शकता. आसाम सरकारने कायदेशीर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा काही राजकीय मुद्दा नाही. तर दोन राज्यांमधील सीमावाद आहे. हा वाद खूप काळापासून सुरू आहे. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सरकार होते. तेव्हाही सीमावाद होता.

हेही वाचा-पोर्नोग्राफी आणि इरोटीकमध्ये नेमका काय फरक आहे? वाचा...

आमची कोणीही एक इंचही जमीन घेऊ शकत नाही-

पुढे मुख्यमंत्री शर्मा म्हणाले, की गोळीबारी चालू असताना मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांना सहावेळा फोन केला. तेव्हा त्यांनी सॉरी म्हटले. मला आयजोल येथे येऊन बोलण्यास सांगितले. आमची एक इंच जमीन कोणीही घेऊ शकत नाही. आम्ही क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उत्तम उपचार करण्याची डॉक्टरांना सूचना केल्याचे शर्मा यांनी आणखी ट्विट केले आहे. गंभीर जखमी पोलिसांना प्राधान्याने एअर रुग्णवाहिकेने उपचारासाठी रवाना करण्याची सूचनाही शर्मा यांनी केली आहे.

हेही वाचा-मानवी मुंडके हातात घेऊन जाणाऱ्या साधुंचा व्हिडिओ व्हायरल, मानवी मांस खाल्ल्याचा पोलिसांना संशय

काय घडली आहे घटना-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांनी सोमवारी वादग्रस्त आसाम-मिझोरम सीमेवर पुन्हा हिंसाचार भडकला. आसाममधील कछार जिल्हा आणि मिझोरम कोलासिब जिल्ह्याच्या सीमेवरील भागात गोळीबार झाला. यामध्ये 6 जवान ठार झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे. घटनेनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा ट्विटरवार (Twitter) पाहायला मिळाला. विशेष म्हणजे दोघांनीही अमित शहा यांना आपापल्या ट्विट पोस्टमध्ये टॅग केले. हिंसाचाराचा व्हिडिओ ट्विट करत मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी गृहमंत्री शहा यांना हस्तक्षेप करण्याच्या मागणीची पोस्ट केली आहे. 'हे आता थांबवण्याची गरज आहे. घटनेमध्ये आसामच्या कछारच्या रस्त्यावरुन मिझोरमला परतणाऱ्या दाम्पत्यासोबत स्थानिक गुंडांनी मारहाण केली. आपण या हिंसक कृत्याला कसा न्याय देऊ शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.