ETV Bharat / bharat

Political instability In Sri Lanka: श्रीलंकेतील परिस्थिती चिघळली! रस्त्यावर आंदोलकांचा कब्जा

author img

By

Published : Jul 10, 2022, 4:58 PM IST

श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक बनत चालली आहे. रस्त्यावर आंदोलकांनी कब्जा केला आहे. लष्कराने त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ( Political instability In Sri Lanka ) त्यांनी सशस्त्र दल आणि पोलिसांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. राष्ट्रपती कुठे आहेत हे कोणालाच माहिती नाही. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे.

श्रीलंकेतील परिस्थिती चिघळली! रस्त्यावर आंदोलकांचा कब्जा
श्रीलंकेतील परिस्थिती चिघळली! रस्त्यावर आंदोलकांचा कब्जा

नवी दिल्ली/चेन्नई/कोलंबो - श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल शवेंद्र सिल्वा यांनी रविवारी एक निवेदन जारी करून लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सध्याच्या राजकीय संकटावर तोडगा काढणे शक्य असल्याचे ते म्हणाले. जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ( Sri Lankan Army Chief General Shavendra Silva ) लष्कर प्रमुखांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. एक दिवस आधी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पायउतार होण्याचे मान्य केले आहे. 13 जुलै रोजी ते पद सोडण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी काही आंदोलकांना अटकही केली - श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटावर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत शनिवारी मध्य कोलंबोच्या फोर्ट परिसरात मोठ्या संख्येने निदर्शक राष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानात घुसले. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्याची ऑफर दिल्यानंतरही आंदोलकांनी त्यांचे खाजगी निवासस्थान पेटवून दिले. तिथल्या जिममध्ये त्याने वर्कआऊटही केले आणि जेवणही केले. आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांना अटकही केली आहे.

अमेरिकेचे श्रीलंकेच्या संसदेला आवाहन : राष्ट्रपती भवनात लाखो रुपये मिळाल्याचा आंदोलकांचा दावा आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ही रक्कम सुरक्षा दलाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तेथे एक बंकरही सापडल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अमेरिकेने रविवारी श्रीलंकेच्या राजकीय समुदायाला लोकांमधील असंतोष दूर करण्यासाठी दीर्घकालीन आर्थिक आणि राजकीय समाधानासाठी पुढे येऊन त्वरीत काम करण्याचे आवाहन केले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने रविवारी सांगितले की, "कोणत्याही राजकीय पक्षाशी नव्हे, तर राष्ट्राच्या भल्यासाठी वचनबद्धतेने पुढे जाण्याचे अमेरिकेने श्रीलंकेच्या संसदेला आवाहन केले आहे."

निवासस्थानांवर सरकारविरोधी निदर्शने सुरूच - "आम्ही या सरकारला किंवा कोणत्याही नवीन, घटनात्मकरित्या निवडलेल्या सरकारला दीर्घकालीन आर्थिक स्थिरता आणि वीज, अन्न आणि पाण्याची उपलब्धता सुधारण्यासाठी उपाय शोधण्यासाठी त्वरीत कृती करण्याची विनंती करतो आहोत. राष्ट्रपती राजपक्षे सध्या कुठे आहेत हे माहित नाही. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रोनिल विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानांवर निदर्शकांनी कब्जा केल्याने रविवारी सरकारविरोधी निदर्शने सुरूच होती.

परकीय चलनाच्या संकटाचा सामना करावा लागतोय - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) रविवारी सांगितले, की ते श्रीलंकेतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आयएमएफने आशा व्यक्त केली की राजकीय गतिरोध लवकरच संपुष्टात येईल जेणेकरून आयएमएफ-समर्थित योजनेवर चर्चा पुन्हा सुरू होईल. (IMF)चे वरिष्ठ मिशन प्रमुख पीटर ब्रुअर आणि मिशन चीफ मासाहिरो नोझाकी यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की आम्ही श्रीलंकेतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. (1948)मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. परकीय चलनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी श्रीलंकेला किमान चार अब्ज डॉलर्सची गरज आहे असही ते म्हणाले आहेत.

संसदेचे अध्यक्ष कार्यवाह राष्ट्रपती होऊ शकतात - 22 दशलक्ष लोकसंख्या असलेला देश सात दशकांतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. श्रीलंकेकडे परकीय चलनाची कमतरता आहे, ज्यामुळे देश इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही. संसदेचे अध्यक्ष कार्यवाह राष्ट्रपती होऊ शकतात, अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये आहे.

हेही वाचा - Wimbledon 2022 : एलेनाने रचला इतिहास, जेतेपद जिंकणारी कझाकिस्तानची ठरली पहिली खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.