Shivsena Symbol Case : धनुष्यबाण चिन्हावर निर्णय नाहीचं, पुढील सुनावणी 20 जानेवारीला

author img

By

Published : Jan 17, 2023, 3:24 PM IST

Updated : Jan 17, 2023, 10:33 PM IST

symbol

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला धनुष्यबाण कुणाचा हा वाद आजही कायम आहे. आज मंगळवार (दि. 17 जानेवारी)रोजी दुपारी चार वाजता यावर निवडणुक आयोगासमोर सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. दरम्यान, यावरील निकाल निवडणूक आयोगाने राखून ठेवला असून पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.

बोलताना वकील उज्वल निकम

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर शिवसेना राजकीय पक्ष व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणत्या गटाचा हक्क राहील यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यामध्ये आमच्याकडे 40 आमदार आणि 13 खासदार असून चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा शिंदे गटाचा आहे. तर, पक्षातून लोक बाहेर पडले ही कल्पना आहे असा युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला असून, पुढील सुनावणी आता येत्या 20 जानेवारीला होणार आहे. आता यावर 20 जानेवारीला अंतिम निर्णय येणार का? याची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे.

शिंदे गटाचे वकिल : शिवसेनेतील फुटीनंतर चिन्ह कुणाचा यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात प्रकरण सुरू आहे. सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेटमलानी यांनी युक्तिवाद केला. महेश जेटमलानी म्हणाले, एकनाथ शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणत्याही त्रृटी नाहीत. याबाबतचा ठाकरे गटाचा आरोप चुकीचा आहे. दरम्यान, सादीक अली प्रकरणाचा जेठमलानी यांच्याकडून दाखलाही देण्यात आला आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी आवश्यक बहुमत शिंदे गटाकडे असल्याचे महेश जेटमलानी यांनी सांगितले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

ठाकरे गटाचे वकिल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असल्याचे शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आले होते. यावेळी चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नका असा, युक्तीवाद ठाकरे गटाचे वकिल कपील सिब्बल यांनी केला आहे. ते म्हणाले, शिंदे गटाची प्रतिज्ञापत्र बोगस आहेत. त्यांची पडताळणी करा कोणताही एक कागद उचला आणि त्याची पडताळणी करा, ठाकरे गटाकडून आयोगाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहण्याची विनंतीही सिब्बल यांनी यावेळी केली आहे. तसेच, निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात. त्यामध्ये सर्व कागदपत्रांची छाननी करावी त्यानंतरच अंतिम निर्णयापर्यंत पोहचवे असेही ही ते म्हणाले आहेत.

संख्याबळ असल्याने ते आम्हालाच मिळणार : धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. मागील आठवड्यात 10 जानेवारी मंगळवारी यावर दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद झाला आहे. आज पुन्हा या संदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनवाणी सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोग काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावर, शिंदे गटाचा जोरदार दावा आहे की, चिन्ह आम्हालाच मिळणार. आमच्याकडे संख्याबळ असल्याने ते आम्हालाच मिळणार असही ते सांगत आहेत.

सुनावणीकडे सर्वांच्या नजरा : उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मागिल सुनावणीत करण्यात आला होता. तर, सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षावर निर्णय घेईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी ठाकरेंच्या पक्षाने निवडणूक आयोगातील सुनावणीदरम्यान केली होती. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागसेल्या आहेत.

२० जानेवारीला पुढील सुनावणी : ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तर आमच्याकडे संख्याबळ जास्त चिन्हाचा निर्णय तातडीने घ्यावा, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेटमलानी यांनी केला. दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय दिलेला नाही. आता २० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा : आशिष देशमुखांचे काँग्रेस अध्यक्षांना पत्र, प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी

Last Updated :Jan 17, 2023, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.