ETV Bharat / bharat

Russia-Ukraine War : रक्तरंजित संघर्ष! रशिया-युक्रेन युध्द अधिक तीव्र; लिव्हमध्ये 7 ठार

author img

By

Published : Apr 19, 2022, 10:54 AM IST

गेल्या 54 दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 55 वा दिवस आहे. यामध्ये युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रोज नव्या ठिकाणी हल्ले होत आहेत. ( Russia-Ukraine War 55Th Day ) यामध्ये अनेक लोकांचे निष्पाप जीव जात आहेत. तर, कित्येक लोक आयुष्यभराचे उद्वस्थ होत आहेत. दरम्यान, रशियाने कितीही हल्ले केले तरी आम्ही माघार घेणार नाही अशी भूमीका युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी घेतली आहे.

Russia-Ukraine War 55Th Day
Russia-Ukraine War 55Th Day

कीव - रशियाने ल्विव्हवर हल्ला करण्यास सुरुवात केली असून पूर्व युक्रेनलाही लक्ष्य करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध अयशस्वी ठरल्याचा दावाही पुतीन यांनी केला आहे. येथे, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात आणखी 7 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ( Russian President Vladimir Putin ) मिळालेल्या माहितीनुसार, सीरियाचे सैनिक रशियाच्या वतीने युक्रेन युद्धात सहभागी होण्यासाठी तयार आहेत. आज युद्धाचा (रशिया-युक्रेन युद्ध) 55 वा दिवस आहे. या युद्धात युक्रेन रोज थोडे थोडे होरपळत आहे. दरम्यान, झेलेन्स्की यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पुतिन यांच्याशी आपण लढण्याचा संकल्प केला आहे अशी भूमीका घेतली आहे.

मित्र राष्ट्रांवर विपरीत परिणाम - रशियाच्या या क्रुर कामामुळे जगातील अमेरिकेसारख्या बलाढ्य देशासह अनेक देशांनी रशियावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले आहेत. पण, रशियावर पाश्चात्य देशांनी लादलेले निर्बंध अयशस्वी ठरल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे म्हटले आहे. पुतीन पुढे म्हणतात, पाश्चात्य देशांना आर्थिक परिस्थिती कोसळणे, बाजारपेठेत घबराट, बँकिंग व्यवस्था कोलमडणे आणि स्टोअरमध्ये वस्तूंचा तुटवडा पडणे हे अपेक्षित होतेच. ( Conflict Between Russia-Ukraine Continues ) आमच्यावर करण्यात आलेल्या या आर्थिक हल्ल्याची रणनीती फसली आहे असही ते म्हणतात. उलट या निर्बंधांचा अमेरिका आणि त्याच्या युरोपियन मित्र राष्ट्रांवर विपरीत परिणाम झाला आहे ज्यामुळे महागाई वाढली आणि दैनंदीन जीवनमान घसरले आहे असही ते म्हणाले आहेत.

लढाई अधिक तीव्र झाली - ल्विवमध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहरात काळ्या धुराचे लोट उठताना दिसत होते. या ठिकाणी अनेक मोठे स्फोट झाले ज्यामध्ये घरच्या घर उद्वस्थ झाले. मोठ्या मोठ्या बिल्डींगमधू धुराचे लोट पाहायला मिळाले. त्यानंतर शहरावर दाट, काळा धूर पसरला. ल्विव्ह आणि उर्वरित पश्चिम युक्रेनमध्ये जवळजवळ दोन महिन्यांच्या युद्धादरम्यान तुरळक हल्ले झाले आहेत. देशाच्या काही भागांमध्ये जेथे लढाई अधिक तीव्र झाली आहे, तेथे लोकांचा जीव धोक्यात आला आहे.

आम्ही आत्मसमर्पण करणार नाहीत - युक्रेनला मदत करण्यासाठी नाटोकडून पाठवण्यात येणारी शस्त्रास्त्रे ल्विव्हमधून येत आहेत. रशियाने पूर्व आणि दक्षिणेकडे आपले सैन्य आणि शस्त्रे वाढवण्यास सुरुवात केल्याने हे हल्ले झाले. असे मानले जाते की तो युक्रेनच्या औद्योगिक गड डोनबासमध्ये नवीन हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. येथे, मारियुपोल स्टील प्लांटमध्ये तैनात असलेल्या युक्रेनियन सैनिकांनी सांगितले, की आम्ही आत्मसमर्पण करणार नाहीत. यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी आणि इतर शहरांवर हल्ले सुरू केले आहेत.

लष्कराच्या जनरलचे कौतुक - युक्रेनमधील विविध शहरांवर सातत्याने हल्ले करणाऱ्या रशियन सैनिकांना मदत करण्यासाठी काही सीरियन सैनिकही युद्धात सहभागी होण्याचा विचार करत आहेत. खरे तर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी (2017)मध्ये सीरियाच्या भेटीदरम्यान सीरियन लष्कराच्या जनरलचे कौतुक केले होते. तसेच, त्यावेळी सीरियन आणि रशियन सैन्याच्या सहकार्याने भविष्यात मोठी उद्दिष्टे साध्य केली जाऊ शकतात असे त्यांनी म्हटले होते.

सीरियन सैनिक रशियाच्या मदतीला - देशाच्या दीर्घकाळ चाललेल्या गृहयुद्धात बंडखोरांना पराभूत करण्यात सीरियन लष्कराच्या जनरलने महत्त्वाची भूमिका बजावली. पुतीन यांचे विधान आता खरे असल्याचे दिसून येत आहे. ब्रिगेडियर जनरल सुहेल अल-हसन यांच्या तुकडीतील शेकडो सीरियन सैनिक रशियन सैन्याच्या वतीने युक्रेनमध्ये लढण्यास तयार आहेत.

युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी तयारी - सीरियन सैनिक, माजी बंडखोर आणि सीरियाच्या वाळवंटात इस्लामिक स्टेटच्या विरोधात वर्षानुवर्षे लढलेले अनुभवी सैनिक युक्रेनमधील रशियन सैन्याच्या मदतीसाठी पाठवले गेले असावेत. युक्रेनविरुद्धच्या युद्धात सामील होण्याची इच्छा व्यक्त करत 16,000 हून अधिक सैनिकांनी प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत. तथापि, विश्लेषकांचे म्हणणे आहे की रशिया पूर्व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमण करून युद्धाच्या पुढील टप्प्यासाठी तयारी करत आहे. येत्या काही आठवड्यांत सीरियन सैनिकांना तैनात केले जाऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे.

हेही वाचा - जहांगीरपुरी हिंसाचारात भाजप अन् त्यांच्या काही संघटनांचा हात; शरद पवार यांचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.