ETV Bharat / bharat

Kerala : सीपीआय(एम) मुख्यालयावर स्फोटके फेकल्याने केरळमध्ये तणावाचे वातावरण.. सीसीटीव्हीत घटना कैद

केरळमध्ये तिरुवनंतपूरम येथील कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया (एम) च्या राज्य कार्यालयावर स्फोटके फेकण्यात आल्याने ( explosives hurled at CPIM headquarters ) तणावाचे वातावरण निर्माण झाले ( Tension grips Kerala ) आहे. सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर आरोप केले असून, काँग्रेसने मात्र आरोप फेटाळले आहेत.

Tension grips Kerala as explosives hurled at CPI(M) headquarters
सीपीआय(एम) मुख्यालयावर स्फोटके फेकल्याने केरळमध्ये तणावाचे वातावरण.. सीसीटीव्हीत घटना कैद
author img

By

Published : Jul 1, 2022, 9:17 AM IST

तिरुवनंतपुरम ( केरळ ) : गुरुवारी (दि. ३० ) रात्री सत्ताधारी सीपीआय(एम) च्या राज्य मुख्यालयावर (एकेजी सेंटर) अज्ञात व्यक्तीने स्फोटक पदार्थ फेकल्यामुळे ( explosives hurled at CPIM headquarters ) केरळमध्ये तणाव निर्माण ( Tension grips Kerala ) झाला. पोलिसांनी सांगितले की, राजधानी शहराच्या मध्यभागी असलेल्या AKG केंद्रावर रात्री 11.30 च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने स्फोटक पदार्थ फेकले. घटनास्थळी पोहोचलेल्या सीपीआय(एम) नेत्यांनी हा ‘बॉम्ब हल्ला’ असल्याचा आरोप केला. पक्षाच्या काही नेत्यांनी, जे एकेजी सेंटरमध्ये थांबले होते, त्यांनी सांगितले की त्यांनी इमारतीच्या बाहेर एक शक्तिशाली स्फोट ऐकला.

घटना सीसीटीव्हीत कैद : पोलिसांना ताबडतोब सतर्क करण्यात आले आणि उच्च अधिकार्‍यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी केली. बॉम्बशोधक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. सीपीआय(एम) ने AKG सेंटरच्या अधिकृत मीडिया ग्रुपद्वारे जारी केलेल्या सीसीटीव्ही व्हिज्युअलमध्ये एक व्यक्ती मोटारसायकलवरून घटनास्थळी पोहोचताना आणि इमारतीवर "बॉम्ब" फेकून घटनास्थळावरून पळून जात असल्याचे दिसले. स्फोटक AKG केंद्राच्या दगडी भिंतीवर आदळले. शेजारी राहणारे वरिष्ठ सीपीआय (एम) नेते आणि एलडीएफचे निमंत्रक ई पी जयराजन यांनी यामागे काँग्रेस असल्याचा आरोप केला आणि सीपीआय (एम) कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

राहुल गांधींचा दौरा : विरोधी पक्ष काँग्रेसने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल आणि शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांच्यासह अनेक मंत्री घटनास्थळी दाखल झाले. माकपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शहरात निषेध मोर्चा काढला. राज्यातील पठाणमथिट्टा आणि इतर ठिकाणीही कामगारांनी निदर्शने केली. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी राज्यातील काँग्रेसच्या कार्यालयांभोवती कडक बंदोबस्त ठेवला होता. सीपीआय(एम)चे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी शांततापूर्ण आंदोलन पुकारले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF जाणीवपूर्वक चिथावणी देत ​​असल्याचा आरोप करत बालकृष्णन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या फंदात पडू नये असे आवाहन केले. या हल्ल्यामागील गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्याच्या आधी ही घटना घडली आहे.

हेही वाचा : Kerala Police: केरळ पोलीस नागरिकांना बंदुक वापरण्याचे प्रशिक्षण देणार; अधिकृत आदेश जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.