ETV Bharat / bharat

Chhattisgarh Crime News : पत्नीने पिऊ दिली नाही दारू..रागाच्या भरात पतीने केला तिचा मर्डर!

author img

By

Published : Dec 24, 2022, 9:55 PM IST

छत्तीसगढच्या गरियाबंद येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. (Chhattisgarh Crime News). येथे एका शिक्षकाने दारू पिऊ न दिल्याने पत्नीची हत्या केली. (teacher Killed wife for refusing to drink alcohol). हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. वाचा संपूर्ण बातमी..(teacher Killed wife in Chhattisgarh).

Chhattisgarh Crime News
Chhattisgarh Crime News

दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीची हत्या

गरियाबंद (छत्तीसगढ) : दारूने एका स्थानिक गरीब कुटुंबाचा नाश केला आहे. जिल्ह्यातील माजरकट्टा येथे एका शिक्षकाचे आधी दारू पिण्यास नकार दिल्याने शिक्षिका पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याने तिच्या डोक्यात रॉडने वार करून तिची हत्या केली. (teacher Killed wife for refusing to drink alcohol). महिलेचे काका मणिराम यांनी सांगितले की, "दोघेही सरकारी शाळेत शिक्षक आहेत. दारुच्या वादातून जावयाने भाचीवर रॉडने हल्ला केला. तिला इतकी मारहाण केली की त्यात तिचा मृत्यू झाला." (teacher Killed wife in Chhattisgarh).

आरोपीचे आत्मसमर्पण : ही घटना 23 डिसेंबरला रात्री उशिरा घडली. रात्री दारूच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. वादातून पतीने पत्नीची हत्या केली, आणि त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केल्यानंतर आरोपीने पोलिसांना सांगितले की, "मला या घटनेचा कोणताही पश्चाताप नाही." पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हत्येप्रकरणी पोलिस काय म्हणतात : गरीयाबंद पोलिस ठाण्याचे प्रभारी राकेश मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माजरकट्टा येथे राहणारे डोमनकांत ध्रुव हे इंदगाव येथे शिक्षक आहेत. त्यांची पत्नी मीना ध्रुव या गंजाईपुरी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना एक दहा वर्षांचा मुलगा तर एक तीन वर्षांची मुलगी आहे. घटनेच्या वेळी दोन्ही मुले आजी-आजोबांच्या घरी गेली होती. डोमनकांत ध्रुव याला दारूचे व्यसन होते. दरम्यान पत्नी मीना ध्रुवने त्याला दारू पिण्यास मनाई केली. त्याचा राग येऊन डोमनकांत ध्रुव याने तिच्या डोक्यात रॉडने वार केले. यामध्ये मीनाचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर घरात सर्वत्र रक्त पसरले. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.