ETV Bharat / bharat

V Senthil Balaji : तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांची चक्क राज्यपालांनी केली मंत्रिमंडळातून हकालपट्टी

author img

By

Published : Jun 29, 2023, 9:21 PM IST

तामिळनाडूच्या राज्यपालांनी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली केली आहे. राजभवनाने दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, सेंथिल बालाजी 'मनी लॉन्ड्रिंगसह भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये अडकले आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हेगारी प्रकरणे सुरू आहेत'.

V Senthil Balaji
V Senthil Balaji

चेन्नई : तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर लाचखोरी, मनी लाँड्रिंगसह अनेक भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गंभीर आरोप आहेत.

V Senthil Balaji
राज्यपाल कार्यालयाची प्रेसनोट

विविध प्रकरणांमध्ये गंभीर गुन्हे : मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर नोकऱ्यांसाठी रोख रक्कम घेणे, मनी लॉन्ड्रिंगसह भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गंभीर फौजदारी कारवाई सुरू आहे. मंत्री म्हणून ते आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. तसेच कायदा सुव्यवस्थेच्या प्रक्रियेत मंत्री सेंथिल बालाजी अडथळा आणत आहेत. अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर आहेत.

मंत्रिमंडळातून हकालपट्टी : सध्या, त्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. तसेच दुसऱ्या एका गुन्हेगारी प्रकरणात ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे राज्य पोलिस तपास करत आहेत. मंत्री वी सेंथिल बालाजी मंत्रिमंडळात असल्याने निष्पक्ष तपास करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. त्यामुळे तपासावर त्याचा परिणाम होत असल्याचे प्रेसनोटमध्ये म्हटले आहे. मंत्री वी सेंथिल बालाजी यांच्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यावस्था बिघडण्याची शक्याता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यपालांनी थिरू व्ही. सेंथिल बालाजी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.

14 जूनला ED कडून अटक : मंत्री सेंथिल बालाजी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 14 जून रोजी नोकरीसाठी रोख रकमेप्रकरणी अटक केली होती. छातीत दुखू लागल्याने त्यांना चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १५ जून रोजी मद्रास उच्च न्यायालयाने सेंथिल बालाजीला खासगी रुग्णालयात हलवले. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

पदाचा गैरवापर : सेंथिल बालाजी आपल्या पदाचा गैरवापर करून तपासावर प्रभाव टाकत असल्याचे राजभवनने म्हटले आहे. अधिकृत प्रकाशनात, राजभवनाने म्हटले आहे की, सेंथिल बालाजींवर नोकऱ्यांसाठी रोख रक्कम घेणे, मनी लाँड्रिंगसह भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये गंभीर फौजदारी कारवाई सुरू आहे. मंत्रिपदाचा गैरवापर करून ते तपासात अडथळे आणून कायदा, न्याय प्रक्रियेत अडथळा आणत आहेत.

हेही वाचा - Amit Shah Security Lapse: नांदेडहून तामिळनाडुला पोहोचताच अमित शाह यांच्या सुरक्षेत त्रुटी, नेमके काय घडले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.