ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानात तालिबानींकडून दाढी करण्यावर बंदी; सलून दुकानदारांना नोटीस

author img

By

Published : Sep 27, 2021, 10:17 PM IST

Updated : Sep 27, 2021, 10:52 PM IST

तालिबानी
तालिबानी

तालिबानींची 1996 ते 2001 मध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्ता होती. या काळात तालिबानींनी दाढी करण्यावर आणि अमेरिकन स्टाईलप्रमाणे दाढी कट करण्यावर बंदी लागू केली होती. याच नियमाची तालिबानींनी पुनरावृत्ती केली आहे.

काबुल/नवी दिल्ली - सत्तेत आलेल्या तालिबानी दहशतवाद्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. हेलमांड प्रांतामधील नागरिकांना दाढी करणे किंवा दाढीचा कट करण्यावर तालिबानींनी बंदी लागू केली आहे. तसे करणे हे इस्लामिक कायद्याचे उल्लंघन असल्याचे तालिबानींनी म्हटले आहे.

दाढी करण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्यास शिक्षा दिली जाईल, असे तालिबानींच्या धार्मिक पोलिसांनी म्हटले आहे. काही सलून व्यावसायिकांनी तालिबानींकडून नोटीस आल्याचे म्हटले आहे. मागील वेळी सत्तेत असतानाचे कठोर नियमांचे पालन करावे, असे नोटीसमधून सूचित होत असल्याचे नाभिकांनी म्हटले आहे.

हेही वाचा-48 तासांच्या आत सैनिकांच्या मृत्यूचा अमेरिकेने घेतला बदला; उडवली ISIS-K ची ठिकाणं

तालिबानींनी हेलमांड प्रांतामधील सलूनवर नोटीस लावली आहे. दाढी करण्याबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे तालिबानी अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कोणालाही तक्रार करण्याचा अधिकार नाही.

हेही वाचा-पंजशीरमध्ये तालिबानी घुसले? शोटुल जिल्हा ताब्यात घेतल्याचा दावा

तालिबानी जवान हे येत राहणार आहेत. ते दाढी न करण्याच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे काबुलमधील एका सलून व्यावसायिकाने म्हटले आहे. शहरामधील एक मोठ्या सलून व्यावसायिकाने सांगितले की, सरकारमधील एका अधिकाऱ्याचा फोन आला होता. अमेरिकन स्टाईलप्रमाणे कोणाचीही दाढी करू नये, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा-पंजशीर ताब्यात घेतल्याचा विजयोत्सव; तालिबानींच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू

नव्या नियमामुळे नाभिकांना जगणे कठीण-

नवीन कायद्यामुळे जगणे कठीण होत असल्याचे स्थानिक सलून व्यावसायिक सांगतात. नोटीस न मिळालेल्या सलून व्यावसायिकांनीही दाढी करणे थांबविले आहे. त्याने सांगितले, की ग्राहक हे दाढी करत नाहीत. कारण, रस्त्यावर तालिबानींकडून हल्ला होऊ नये, असे नागरिकांना वाटत होते.

तालिबानींची 1996 ते 2001 मध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्ता होती. या काळात तालिबानींनी दाढी करण्यावर आणि अमेरिकन स्टाईलप्रमाणे दाढी कट करण्यावर बंदी लागू केली होती.

Last Updated :Sep 27, 2021, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.