ताजमहाल हे 'शिवमंदिर', नाव बदलून 'राममहल' ठेवणार; सुरेंद्र सिंह यांचे वादग्रस्त विधान

author img

By

Published : Mar 14, 2021, 8:00 AM IST

सुरेंद्र सिंह
सुरेंद्र सिंह ()

उत्तर प्रदेशचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा बोलताना अकलेचे तारे तोडले आहेत. ताजमहल हे पूर्वी शिवमंदिर होते. त्यामुळे लवकरच ताजमहलाचे नाव बदलून राममहल असे ठेवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा बोलताना अकलेचे तारे तोडले आहेत. ताजमहल हे पूर्वी शिवमंदिर होते. त्यामुळे लवकरच ताजमहलाचे नाव बदलून राममहल असे ठेवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ यांचा उल्लेख त्यांनी शिवाजी असा केला. उत्तर प्रदेशात शिवाजीचे वंशज म्हणून आदित्यनाथ आले आहेत, असे ते म्हणाले.

मुस्लीम राज्यकर्ते व आक्रमणकर्त्यांनी भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल. पण आता ती पूर्ववत करण्यासाठी सुवर्णकाळ आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजांच्या कुळातील आहेत. आणि ते नक्कीच ताजमहालचे नाव बदलतील, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. बंगाल वाचवायचा असेल तर बंगालच्या लोकांना ममतांचा त्याग करावा लागेल. कारण ममता बॅनर्जी राक्षस आहेत. लोकांच्या सहानुभूतीसाठी त्या जखमी असल्याचे नाटक करत आहेत, असे सिंह म्हणाले.

ताजमहल हे शिवमंदीर असल्याचा वाद -

ताज महाल ही कबर नसून वास्तवात ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असलेले तेजोमहल असल्याचं काही हिंदूवादी संघटनांनकडून म्हटलं जात. ताज महालचं मूळ शिवमंदिरात असल्याच्या याचिकाही न्यायालयात करण्यात आल्या होत्या. ताज महाल ही मुघल बादशाह शाहजहान व त्याची पत्नी मुमताज महल यांची कबरच असल्याचं प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागानं आग्रा कोर्टामध्ये सादर केलं होतं. त्यामुळे ताज महाल ही मुमताजची कबर आहे की शिवमंदीर या संदर्भात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला होता. मात्र, यंदा महाशिवरात्रीला काही हिंदूवादी लोकांनी ताजमहलमध्ये जाऊन शिवपूजन करण्यास सुरवात केली होती. मुख्य घुमटासमोर शिव पूजन करताना हिंदूवादी संघटनेच्या लोकांना सीआयएसएफने ताब्यात घेतले. त्यात हिंदू महासभेचे प्रांताध्यक्ष मीना दिवाकर देखील सहभागी आहेत.

हेही वाचा - आणखी एका भाजप आमदाराची मुक्ताफळे; म्हणे 'पालकांनी मुलींना संस्कार शिकवले तर बलात्कार थांबतील'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.