ETV Bharat / bharat

Supreme Court Judges Appointed : कॉलेजियम शिफारशीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन न्यायााधीशांची निवड, कोण आहेत हे न्यायाधीश?

author img

By

Published : Jul 13, 2023, 8:21 AM IST

तेलंगाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उज्जल भुयान आणि केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्यंकटनारायण भाटी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या का कॉलेजियमने शिफारस केली होती. कॉलेजियमच्या शिफारशीवरुन या दोन मुख्य न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Supreme Court Judges Appointed
न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती एस व्ही भाटी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस व्यंकटनारायण भाटी यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विट करुन दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने या दोघांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.

कायदा मंत्र्यांनी काय केले ट्विट : केंद्रीय कायदा मंत्र्यांनी ट्विट करुन या दोन मुख्य न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती केल्याची माहिती दिली. यावेळी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी “भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून माननीय राष्ट्रपतींनी माननीय सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर या दोन न्यायमुर्तींची नियुक्ती करताना आनंद होत आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती उज्जल भुयान, मुख्य न्यायमूर्ती एस व्यंकटनारायण भाटी यांची नियुक्ती करण्यात येत आहे, असे ट्विट करत माहिती दिली आहे.

  • In exercise of the powers conferred by the Constitution of India, the Hon’ble President, after consultation with the Hon’ble Chief Justice of India, is pleased to appoint the following 02 Chief Justices of High Courts as Judges of the Supreme Court of India pic.twitter.com/RYhHpEYWHZ

    — Arjun Ram Meghwal (@arjunrammeghwal) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली होती शिफारस : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उज्वल भुयान आणि केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्यंकटनारायण भाटी यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस 5 जुलै रोजी केली होती. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने पात्र मुख्य न्यायमूर्ती आणि उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्तींची योग्यता, सचोटी आणि योग्यता यांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करण्यात आले आहे. बहुसंख्य विचारांना सामावून घेतल्यानंतर कॉलेजियमला न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती एस व्यंकटनारायण भाटी हे योग्य असल्याचे आढळले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी सर्व बाबतीत ते योग्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कॉलेजियममध्ये न्यायमूर्ती एस के कौल, संजीव खन्ना, बी आर गवई आणि सूर्यकांत यांचाही समावेश आहे.

कोण आहेत न्यायमूर्ती उज्जल भुयान : न्यायमूर्ती उज्जल भुयान यांची 17 ऑक्टोबर 2011 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते त्यांच्या मूळ उच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. सध्या ते 28 जून 2022 पासून तेलंगणा राज्यात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. न्यायमूर्ती भुयान यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि तेलंगणा राज्यात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात न्यायमूर्ती भुयान यांनी कायद्याच्या विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अनुभव संपादन केला आहे.

न्यायमूर्ती एस व्यंकटनारायण भाटींना आहे दीर्घ अनुभव : न्यायमूर्ती एस व्यंकटनारायण भाटी यांची 12 एप्रिल 2013 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. ऑगस्ट 2022 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे कोणतेही प्रतिनिधित्व नाही. त्यांची मार्च 2019 मध्ये केरळ उच्च न्यायालयात बदली झाली होती. न्यायमूर्ती एस व्यंकटनारायण भाटी हे 01 जून 2023 पासून तेथे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दीर्घकाळात आंध्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ते कार्यरत आहेत. न्यायमूर्ती भट्टी यांनी कायद्याच्या विविध शाखांमध्ये लक्षणीय अनुभव संपादन केला आहे.

हेही वाचा -

  1. Woman Chief Justice For Gujarat HC : गुजरात उच्च न्यायालयाला लाभणार महिला मुख्य न्यायाधीश; मुंबई उच्च न्यायालयात 'या' न्यायमूर्तींची कॉलेजियमकडून शिफारस
  2. CJI DY Chandrachud: कायद्याला मानवतेचा स्पर्श असावा, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.