ETV Bharat / bharat

AgustaWestland scam case: ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी आयएएफच्या 4 माजी अधिकाऱ्यांना समन्स

author img

By

Published : Jul 18, 2022, 5:28 PM IST

4 माजी अधिकाऱ्यांना समन्स
4 माजी अधिकाऱ्यांना समन्स

3,600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने भारतीय वायुसेनाच्या चार माजी अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. न्यायालयाने हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना 30 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे (AgustaWestland scam case) . सीबीआयने या चार आरोपी अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची परवानगी घेतली आहे.

नवी दिल्ली: 3,600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने चार माजी आयएएफ अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहेत. विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी चार आरोपी अधिकाऱ्यांना 30 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत (AgustaWestland scam case).

चार अधिकाऱ्यांना समन्स - न्यायालयाने निवृत्त हवाई दल एव्हीएम जेएस पानेसर, निवृत्त एअर कमोडोर एन संतोष, निवृत्त एअर कमोडोर एसए कुंटे आणि निवृत्त विंग कमांडर थॉमस मॅथ्यू यांना समन्स बजावले आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 15 जुलै रोजी सीबीआयने चार आरोपी अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची परवानगी घेतल्याचे सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने चौघांना समन्स बजावण्याचे आदेश दिले.

आदेशानुसार आरोपपत्रात नावे - सीबीआयने 16 मार्च रोजी माजी संरक्षण सचिव शशिकांत शर्मा आणि अन्य चार अधिकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. 23 ऑक्टोबर 2020 रोजी न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली. 19 सप्टेंबर 2020 रोजी सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. ख्रिश्चन मिशेल, राजीव सक्सेना, ऑगस्टा वेस्टलँड इंटरनॅशनलचे संचालक जी सपोनारो आणि माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांचे नातेवाईक संदीप त्यागी यांना पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. माजी कॅग आणि माजी संरक्षण सचिव शशिकांत शर्मा यांना या आरोपपत्रात आरोपी करण्यात आलेले नाही. कारण त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी सीबीआयला त्यावेळी कोणतीही मान्यता मिळाली नव्हती.

आधीपासून कारवाई सुरू - या घोटाळ्यात ईडीने जानेवारी 2019 मध्ये ब्रिटिश नागरिक ख्रिश्चन मिशेलला अटक केली होती. मिशेलचे दुबईतून प्रत्यार्पण करून डिसेंबर 2018 मध्ये भारतात आणण्यात आले. मिशेल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

हेही वाचा - Rice planting machine: तरुण शेतकऱ्याने बनवले भात लावणीचे भन्नाट मशिन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.