ETV Bharat / bharat

'अग्नि-1'ची यशस्वी चाचणी, वैशिष्ट्ये पाहूनच शत्रुंना भरेल धडकी!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 8:29 AM IST

Updated : Dec 8, 2023, 12:08 PM IST

Ballistic Missile Agni 1 : भारतानं गुरुवारी (7 डिसेंबर) मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइल 'अग्नि-1'चे यशस्वीपणे चाचणी केली. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयानं माहिती दिली आहे.

successful test of ballistic missile agni 1
बॅलेस्टिक मिसाइल 'अग्नि-1'ची यशस्वी चाचणी

बालासोर (ओडिशा) Ballistic Missile Agni 1 : भारतानं गुरुवारी (7 डिसेंबर) ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइल 'अग्नि-1' ची यशस्वी चाचणी घेतली. अग्नी-1 क्षेपणास्त्रची मारक क्षमता 700 किलोमीटरपर्यंत असून हे क्षेपणास्त्र 1000 किलो अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.

  • Training launch of Short-Range Ballistic Missile ‘Agni-1’ was carried out successfully from APJ Abdul Kalam Island, Odisha today. 'Agni-1' is a proven very high-precision missile system. The user training launch, carried out under the aegis of the Strategic Forces Command,… pic.twitter.com/JR3PfWn26Z

    — ANI (@ANI) December 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोबाइल लाॉन्चर्सच्या सहाय्यानं लॉन्च करता येईल : एका अधिकाऱ्यांनं दिलेल्या माहितीनुसार, भारतानं ओडिशाच्या किनारपट्टीवरून कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-1 चं यशस्वी प्रक्षेपण केलंय. या क्षेपणास्त्रची रेंज 700 ते 2500 किलोमीटर इतकी आहे. हे 12 टन वजनाचे अन् 15 मीटर लांब आहे. तसंच हे 1000 किलो पर्यंतचे अण्वस्त्रे आणि क्लस्टर दारूगोळा वाहून नेऊ शकते. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र मोबाइल लाॉन्चर्सच्या सहाय्यानं लॉन्च केलं जाऊ शकतं. तसंच या क्षेपणास्त्राचे व्यवस्थापन हे भारतीय सैन्य दलाच्या स्ट्रॅजिक कमांड फोर्स अंतर्गत येते.

संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वाचे : 1 जून रोजी याच जागेवरुन क्षेपणास्त्रची शेवटची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रची या भारताच्या आण्विक वितरण पर्यायांचा मुख्य आधार आहे. गेल्या डिसेंबरमध्ये भारतानं 5,000 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर हल्ला करू शकणार्‍या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रची अग्नी-5 ची यशस्वी चाचणी घेतली होती. अग्नी 1 ते 4 क्षेपणास्त्रचीची रेंज 700 किमी ते 3,500 किमीपर्यंत आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये, भारतानं बॅलेस्टिक मिसाइल संरक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बंगालच्या उपसागरातील ओडिशाच्या किनार्‍यावरील जहाजातून इंटरसेप्टर मिसाइलची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या घेतली.

हेही वाचा -

  1. India To Buy Russian, American Missile : भारत अमेरिका, रशियाकडून खरेदी करणार क्षेपणास्त्र; संरक्षण दलाचा प्रस्ताव
  2. Sacking Of Group Captain : क्षेपणास्त्र हल्ल्यात Mi-17 हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे ग्रुप कॅप्टनला निलंबित करण्याची शिफारस
  3. BrahMos Missile: वायुसेनेची शक्ती वाढली.. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची 'रेंज' वाढली.. शत्रूला करणार 'अशा'प्रकारे 'टार्गेट'
Last Updated :Dec 8, 2023, 12:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.