Mekedatu Padayatra : काँग्रेसला पदयात्रा बंद करण्याचे कर्नाटक राज्य सरकारचे आदेश

author img

By

Published : Jan 13, 2022, 1:22 PM IST

काँग्रेसची पदयात्रा

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) ची पदयात्रा थांबवण्यास राज्य सरकार सक्षम नाही का? असा प्रश्न कार्नाटक (Karnatak State Congress) उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. दरम्यान, आज (दि. 13 जानेवारी)रोजी कर्नाटक सरकारने मेकेदाटू येथे (action regarding Mekedatu Padayatra) पदयात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेस नेत्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.

रामनगर (कर्नाटक) - कोणतीही परवानगी नसताना तसेच कोरोनाचे मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेले असताना अशी रॅली आणि मेळाव्याला कशी परवाणगी दिली जावू शकते? कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) ची पदयात्रा थांबवण्यास राज्य सरकार सक्षम नाही का? असा प्रश्न कार्नाटक उच्च (Karnatak State Congress) न्यायालयाने उपस्थित केला होता. (action regarding Mekedatu Padayatra) दरम्यान, आज (दि. 13 जानेवारी)रोजी कर्नाटक सरकारने पदयात्रेत (Mekedatu Padayatra In karnatak) सहभागी झालेल्या काँग्रेस नेत्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.

मात्र, पदयात्रा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, पक्ष कार्यालयात शिवकुमार, सिद्धरामय्या आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. काँग्रेस नेत्यांनी आपली पदयात्रा स्थगित केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. दरम्यान, येत्या काळात आम्ही भाडेवाढीवर आंदोलन करणार असल्याची माहिती सिद्धरामय्या यांनी यावेळी दिली आहे.

याचबरोबर शासन आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. तसेच, रविकुमार यांनी रामनगरचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांना काँग्रेसची पदयात्रा तत्काळ थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पदयात्रेबाबत उच्च न्यायालयाने सरकारला प्रश्न विचारला. त्यानंतर मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने सरकारने पदयात्रेवर निर्बंध घातले आहेत. तसेच, पदयात्रेच्या नावाखाली बाईक रॅलीलाही बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर पदयात्रेच्या नावाखाली रामनगरमधून ये-जा करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांनी परिवहन आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा - घाबरू नका! फक्त 14 टक्केच लोकं रूग्णालयात; तर 0.32 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर -टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.