ETV Bharat / bharat

Allegations On WFI President : कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर  महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळाचा आरोप

author img

By

Published : Jan 19, 2023, 12:37 PM IST

कुस्तीपटू विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. लैंगिक छळाच्या आरोपांवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणाले की, माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी स्वतःला फाशी देईन.

WFI President Brijbhushan Sharan Singh
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षकांविरुद्ध ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगाटने महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाची दखल घेतली आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाकडून पुढील ७२ तासांत स्पष्टीकरण मागवले आहे. आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विनेश, ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह ३० हून अधिक कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर निषेध केला.


प्रशिक्षकांवरही शोषणाचे आरोप : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून मला मानसिक छळ सहन करावा लागला, आत्महत्येचा विचारही केला होता, असे विनेशने सांगितले. डब्ल्यूएफआय अध्यक्ष आणि राष्ट्रीय शिबिराच्या काही प्रशिक्षकांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले आहे. ती म्हणाली की मी उद्या जिवंत असेन की नाही हे मला माहीत नाही. लखनऊ महिला कुस्तीपटूंची शिकार करणे खुप सोपे आहे. आम्ही अनेकदा कॅम्प लखनऊपासून दूर हलवण्याची विनंती केली आहे.

तर होणार कारवाई : निषेधाच्या काही तासांनंतर, क्रीडा मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले की डब्ल्यूएफआईने पुढील तीन दिवसांत प्रतिसाद न दिल्यास, ते राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, 2011च्या तरतुदींनुसार महासंघाविरुद्ध कारवाई सुरू करतील. क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, दिल्लीत ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर डब्ल्यूएफआयकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

प्रशिक्षण शिबिर रद्द : डब्ल्यूएफआयला पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने म्हटले आहे की, हे प्रकरण खेळाडूंच्या कल्याणाशी संबंधित असल्याने मंत्रालयाने ते अतिशय गांभीर्याने घेतले आहे. निषेधाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने महिला कुस्तीपटूंसाठी आगामी कुस्ती शिबिरही रद्द केले आहे. महिलांचे राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर 18 जानेवारी 2023 पासून लखनऊ येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाज नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (NCOE) येथे होणार होते. त्यात 41 पैलवान आणि 13 प्रशिक्षकांचा समावेश होता.

जीवे मारण्याची धमकी : विनेशने असेही सांगितले की, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात तक्रार केल्याबद्दल तिला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. ती म्हणाली, छळाची तक्रार पंतप्रधानांकडे केल्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. कुस्तीपटू डब्ल्यूएफआय प्रशासनात बदल करण्याची मागणी करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे डब्ल्यूएफआय प्रमुखावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

शरण सिंह म्हणतात तर.. फाशी घेईन : ब्रिजभूषण शरण सिंह वय ६६ हे जवळपास एक दशकापासून डब्ल्यूएफआयचे प्रभारी आहेत. ज्यांची 2019 मध्ये तिसर्‍यांदा डब्ल्यूएफआय अध्यक्ष म्हणून तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवड झाली. त्यांनी शीर्ष भारतीय कुस्तीपटूंनी आपल्यावर लावलेले लैंगिक छळाचे आरोप फेटाळून लावले आणि म्हणाले, माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: फाशी घेईन.

माझ्या विरुद्ध कट : शरण सिंह म्हणाले, माझ्याविरोधात हे षडयंत्र असून त्यात एका बड्या उद्योगपतीचा हात आहे. जेव्हा विनेश फोगट हरली तेव्हा मी तिला प्रेरित केले होते. मी खेळाडूंशी बोलणार आहे. मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. लैंगिक छळ कधी झाला नाही. एकाही खेळाडूने पुढे येऊन हे सिद्ध केले तर मी स्वत:ला फाशी देईन.

हेही वाचा : sexual harassment allegations On WFI President लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे दुख झाले, बृजभूषण सिंह यांनी व्यक्त केला संताप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.