ETV Bharat / bharat

Amit Shah in Chandigarh : अमित शाह यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट, उच्चस्तरीय चौकशी करण्याची आई-वडिलांची मागणी

author img

By

Published : Jun 4, 2022, 5:06 PM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी पंजाबमध्ये ( Amit Shah Punjab Visit ) दाखल झाले आहेत. यादरम्यान पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ( law and order situation in Punjab ) चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab Chief Minister Bhagwant Mann ) यांनी मारेकर्‍यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकणार असल्याची शुक्रवारी ग्वाही दिली होती.

अमित शाह सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
अमित शाह सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

चंदीगड - पंजाबचा गायक शुभदीप सिंग उर्फ ​​सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी शनिवारी चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ( parents of Punjab singer Shubhdeep Singh ) भेट घेतली. सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी अमित शाह यांच्याशी 10-15 मिनिटे चर्चा केल्याचे सांगितले ( Amit Shah meet Shubhdeep Singhs father ) जात आहे. मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यावेळी भाजपचे अनेक बडे नेतेही उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी पंजाबमध्ये ( Amit Shah Punjab Visit ) दाखल झाले आहेत. यादरम्यान पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ( law and order situation in Punjab ) चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab Chief Minister Bhagwant Mann ) यांनी मारेकर्‍यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकणार असल्याची शुक्रवारी ग्वाही दिली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येबाबत पोलिसांना महत्त्वाचे सुगावा मिळाले आहेत. गुन्हेगारांना लवकरच पकडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मुसेवालाच्या कुटुंबियांना आश्वासन दिले.

  • #WATCH पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला के परिवार ने चंडीगढ़ में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मुलाकात की। pic.twitter.com/UUzUNBcf1C

    — ANI_HindiNews (@AHindinews) June 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला- मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, मुसेवाला हे बहुगुणसंपन्न कलाकार होते. त्यांना मंत्रमुग्ध आवाज आणि सर्जनशीलता लाभली होती. ते म्हणाले की त्यांच्या अकाली आणि दुःखद निधनाने संगीत उद्योगाला आणि विशेषतः त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पंजाब सरकारने सुरक्षेत कपात केल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी कालावधीत गुंडांनी मुसेवाला यांची हत्या केली.

राज्य प्रशासन गुन्हेगारी रोखण्यात सतत अपयशी- भाजपच्या पंजाब युनिटच्या एका नेत्याने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली. जगजित सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेत, मूसवाला यांच्या हत्येमध्ये आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्यात यावा, असे याचिकेत म्हटले आहे. राज्य प्रशासन गुन्हेगारी रोखण्यात सतत अपयशी ठरले आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये भय आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळ्यांचा संघर्ष रोखण्यातही अपयशी ठरल्याचे याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा-Hyderbad Gang Rape Case : हैदराबाद बलात्कार प्रकरणात दोघांना अटक; तीन अल्पवयीन

हेही वाचा-Jubilee hills minor gang rape case : हैदराबादमधील अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणात फरार तीन आरोपींना अटक

हेही वाचा-Boiler Explosion in Hapur : उत्तर प्रदेशातील हापूर येथे रासायनिक कारखान्यात स्फोट, 6 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.