ETV Bharat / bharat

Madhya Pradesh : गावकऱ्यांचा दावा मगरीने मुलाला गिळले, ठेवले बांधून.. दुसऱ्या दिवशी नदीत तरंगताना आढळला मुलाचा मृतदेह

author img

By

Published : Jul 13, 2022, 10:27 AM IST

श्योपूरमध्ये, गावकऱ्यांनी दावा केला की नदीच्या काठावर खेळत असलेल्या एका मुलाला मगरीने गिळंकृत ( crocodile attacked child in Sheopur ) केले. त्यानंतर गावकऱ्यांनी मगरीला पकडून बांधून ( crocodile held hostage in Sheopur ) ठेवले. परंतु, दुसऱ्याच दिवशी मुलाचा मृतदेह नदीतच आढळून ( Sheopur Child Death after Crocodile Attack ) आला. मग मृतदेहाला बाहेर काढून मगरीला वन कर्मचाऱ्यांनी पुन्हा निसर्गात मुक्त केले.

crocodile attacked child in Sheopur crocodile held hostage
गावकऱ्यांचा दावा मगरीने मुलाला गिळले, ठेवले बांधून.. दुसऱ्या दिवशी नदीत तरंगताना आढळला मुलाचा मृतदेह

श्योपूर ( मध्यप्रदेश ) : नदीकाठी खेळत असलेल्या 10 वर्षीय मुलावर मगरीने हल्ला ( crocodile attacked child in Sheopur ) केला, त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी मगरीला ( crocodile held hostage in Sheopur ) पकडले. मगरीच्या पोटात मूल जिवंत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यानंतर गावकऱ्यांनी मुलाला पोटातून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र तो मुलगा मगरीच्या पोटात नव्हे तर नदीतच पडून मृत पावला ( Sheopur Child Death after Crocodile Attack ) होता. काल मुलाचा मृतदेह मगरीतून नाही तर नदीतून सापडला आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

खेळणाऱ्या मुलावर मगरीचा हल्ला : रघुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिजेंटा गावाजवळील चंबळ नदीच्या काठावर मगरीने हल्ला केला, रिजेंटा गावातील रहिवासी असलेला १० वर्षांचा मुलगा अतर सिंग नदीच्या काठावर वाळूवर खेळत होता. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केवट नदी पाण्यातून बाहेर आल्यानंतर मगरीने मुलावर हल्ला केला. शेजारी उभ्या असलेल्या गावकऱ्यांना मगरीने मुलावर हल्ला करताना पाहिल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मगरीला पकडून दोरीने बांधले.

गावकऱ्यांचा दावा मगरीने मुलाला गिळले, ठेवले बांधून.. दुसऱ्या दिवशी नदीत तरंगताना आढळला मुलाचा मृतदेह

बालक जिवंत असल्याचा ग्रामस्थांचा दावा : मगरीच्या पोटात मूल असून मुलगा जिवंत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. घटनेनंतर गावकऱ्यांनी मगरीच्या तोंडात लाकूड अडकवले होते, जेणेकरून मगरीने गिळलेल्या मुलाला ऑक्सिजन मिळेल आणि तो जिवंत राहू शकेल.

नदीत तरंगताना आढळला मृतदेह : तासाभराच्या अथक परिश्रमानंतर वन कर्मचाऱ्यांनी मगरीची गावकऱ्यांकडून सुटका करून चंबळ नदीत सुखरूप सोडले. त्यानंतर मंगळवारी सकाळी मुलाचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. मुलाच्या अंगावर जखमेच्या खुणाही आहेत, मात्र मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समजेल. याप्रकरणी मृत मुलाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, "मुल खेळत असताना पाणी पिण्यासाठी नदीकाठावर पोहोचताच मगरीने त्याला गिळंकृत केले. नंतर सर्वांनी मगरीला पकडून बाहेर काढले, मात्र आज सकाळी मुलाचा मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगताना आढळला.

गावकऱ्यांचा दावा मगरीने मुलाला गिळले, ठेवले बांधून.. दुसऱ्या दिवशी नदीत तरंगताना आढळला मुलाचा मृतदेह

एएसपी सतेंद्र सिंह तोमर म्हणाले की, "रघुनाथपूर पोलीस स्टेशन परिसरात गेल्या दिवशी एक दुःखद घटना समोर आली होती. एका मगरीने मुलावर हल्ला केला होता. मगरीने त्याला गिळले असावे असा गावकऱ्यांचा अंदाज होता. पण सकाळी मुलाचा मृतदेह सापडला. नदीतून मृतदेहाला बाहेर काढण्यात आले आहे. रघुनाथपूर पोलिसांनी मृतदेहाचे पीएम करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : VIDEO: गावात शिरली मगर, रस्त्यावरुन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.