ETV Bharat / bharat

Sadhu Died In Mathura : १०० रुपयांच्या दक्षिणेसाठी साधूंनी केली गर्दी.. चेंगराचेंगरीत एका साधूचा मृत्यू

author img

By

Published : Jul 20, 2022, 3:57 PM IST

मथुरेत प्रसाद वितरणादरम्यान चेंगराचेंगरीमुळे गर्दीत दबून एका साधूचा मृत्यू झाला ( sadhu died in stampede ) आहे. नातेवाइकांनी साधूचा मृतदेह सोबत नेला आहे. पोलिस याला साधा मृत्यू म्हणत ( stampede during prasad distribution ) आहेत.

SADHU DIED IN STAMPEDE DURING PRASAD DISTRIBUTION IN MATHURA
१०० रुपयांच्या दक्षिणेसाठी साधूंनी केली गर्दी.. चेंगराचेंगरीत एका साधूचा मृत्यू

मथुरा : वृंदावन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिक्रमा मार्गावर असलेल्या श्री राधा-किशोरी भक्ती सेवा धामच्या बाहेर प्रसाद वितरणादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान गर्दीखाली दबून एका साधूचा मृत्यू ( sadhu died in stampede ) झाला. प्रसाद वाटपाच्या वेळी 100 रुपये दक्षिणा मिळाल्याच्या माहितीवरून चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत ( stampede during prasad distribution ) आहे. सध्या मृत साधूचे नातेवाईक मृतदेह सोबत घेऊन गेले आहेत.

विशेष म्हणजे हे प्रकरण वृंदावन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रख्यात भागवत कथा वाचक इंद्रदेव सरस्वती महाराज यांच्या आश्रमाच्या श्री राधा-किशोरी भक्ती सेवा धाम बाहेरील आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी येथे साधूंना प्रसाद वाटप सुरू असताना 100 रुपये दक्षिणा मिळाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे घटनास्थळी साधूंची मोठी गर्दी होऊ लागली. यावेळी गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली. गर्दीखाली दबून एका साधूचा मृत्यू झाला.

१०० रुपयांच्या दक्षिणेसाठी साधूंनी केली गर्दी.. चेंगराचेंगरीत एका साधूचा मृत्यू


योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे ही घटना घडल्याचे समजते. तर स्थानिक पोलीस याला नैसर्गिक मृत्यू म्हणत आहेत. गणेशीलाल (रा. झाशी ) असे मृत साधूचे नाव आहे. जो गेल्या एक वर्षापासून पत्नी मुन्नी देवीसोबत परिक्रमा मार्गावर राहत होता. मृताचे नातेवाईक त्याचा मृतदेह सोबत घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : मथुरेत फिल्मी थरार; भररस्त्यात पेटवली आपलीच कार..!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.