ETV Bharat / bharat

Russia-Ukraine War 65th day : रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्ले सुरूच

author img

By

Published : Apr 29, 2022, 1:11 PM IST

संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या भेटीदरम्यान रशियाने कीवसह युक्रेनच्या मोठ्या भागांवर बॉम्बफेक केली आहे. या हल्ल्यात एक जण ठार झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत अशी माहिती येथील सैनिकांनी दिली आहे. (US President Joe Biden) दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला मदत देण्याच्या तयारीत आहेत. सुमारे दोन महिन्यांहून सुरू असलेले ये युद्ध तूर्त तरी संपेल असे काही चित्र दिसत नाही.

Russia Ukraine war 65th day
Russia Ukraine war 65th day

किव - पूर्व युक्रेनमधील रशियन हल्ले तीव्र झाले तेव्हा संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी याचा आढावा घेण्यासाठी कीव बाहेरील शहरांना भेट दिली. या शहरांना युद्धाचा पहिला फटका सहन करावा लागला. (Russia failed to capture capital Kyiv) त्याचवेळी, यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बुका सारख्या शहरांच्या भेटी दरम्यान केलेल्या क्रूरतेचा निषेध केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या तासाभरानंतर हा हल्ला झाला. एका प्रवक्त्याने सांगितले की, गुटेरेस आणि त्यांचे कर्मचारी सुरक्षित आहेत. दरम्यान, या स्फोटाचे वृत्त देशभरातून प्राप्त झाले. (Ukrainian President Volodymyr Zelensky) पोलिन, चेर्निहाइव्ह आणि फास्टिव्हमध्येही बॉम्बस्फोट झाले. दक्षिण युक्रेनमधील ओडेसाच्या महापौरांनी सांगितले की, हवाई संरक्षण यंत्रणेने रॉकेट हल्ले उधळून लावले आहेत.

राजधानी कीव ताब्यात घेण्यात अयशस्वी झाल्यामुळे रशियाला आपल्या सैन्याच्या रचनेत बदल कारावा लागला आहे. त्यानंतर रशियाने आपले लक्ष पूर्व युक्रेनच्या औद्योगिक केंद्राकडे वळवले, जिथे युद्ध सुरू आहे. (United Nations Secretary General Antonio Guterres) युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, डोनबासच्या अनेक भागात गेल्या अनेक दिवसांपासून भीषण लढाई सुरू आहे. मारियुपोल बॉम्बस्फोटामुळे आता नवे नुकसान झाले आहे असही त्यांनी सांगितले आहे.

युक्रेन प्रशासनाने सांगितले की आग्नेय बंदर शहरात राहणारे त्यांचे नागरिक धोकादायक अस्वच्छ परिस्थितीचा सामना करत आहेत. तर, दोन्ही बाजूंनी वेढा घातल्याने अनेक मृतांचा अंत्यविधीही करता आलेला नाही. कीवच्या उपनगरातील इरपिन येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आलेले गुटेरेस म्हणाले, "जिथे युद्ध सुरू असेल, तिथे तुम्हाला सर्वाधिक किंमत मोजावी लागेल."

बुचामध्ये, गुटेरेस म्हणाले, "जेव्हा आपण युद्ध गुन्ह्यांबद्दल बोलतो, तेव्हा आपण हे विसरू शकत नाही की सर्वात वाईट गुन्हा म्हणजे युद्ध आहे." सध्या खार्किव आणि डोनेस्तकमध्ये रशियन आणि युक्रेनच्या सैन्यांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. लुहान्स्कचे गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनी सांगितले की, त्यांच्या क्षेत्रासह डॉनबासवर रशियाकडून जोरदार हल्ले केले जात आहेत.

दरम्यान, युक्रेनने मित्र राष्ट्रांना अधिक लष्करी उपकरणे पाठवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ते आपला लढा सुरू ठेवू शकतील. नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी गुरुवारी सांगितले की नाटो सहयोगींनी युक्रेनला आतापर्यंत किमान 8 अब्ज डॉलर्सची लष्करी मदत देण्याचे वचन दिले आहे. युक्रेनसाठी आमचा पाठिंबा वाढवण्याचे महत्त्व आम्हाला समजते. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला आपल्या प्रचंड युद्धनौकेचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियन नौदलाकडे युक्रेनच्या किनारपट्टीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या ताज्या प्रस्तावावर, व्हाईट हाऊसने सांगितले की युक्रेनला 20 अब्ज डॉलर्सहून अधिक लष्करी मदत आणि शेजारील देशांच्या संरक्षण प्रणालीला बळ देण्यासह पाच महिन्यांची मदत अपेक्षित आहे, तर $8.5 अब्ज राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचे सरकार आणखी तीन अब्ज डॉलर्स निधी देईल. युद्धामुळे विस्थापित झालेल्या 5 दशलक्ष निर्वासितांसह नागरिकांना अन्न आणि मानवतावादी मदतीसाठी ही मदत दिली जाणार आहे.

हेही वाचा - Non Muslim village In Bihar : हा खरा भारत! गावात एकही मुस्लीम नसताना रोज होते नमाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.