ETV Bharat / bharat

Bhagwat Met Ilyasi: सरसंघचालक मोहन भागवतांनी मशिदीत घेतली इमाम इलियासी यांची भेट

author img

By

Published : Sep 22, 2022, 11:28 AM IST

Bhagwat Met Ilyasi राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत RSS chief Mohan Bhagwat यांनी आज दिल्लीत ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख इमाम डॉ. इमाम उमर अहमद इलियासी Imam Umer Ahmed Ilyasi यांची भेट घेतली.

RSS chief Mohan Bhagwat meets Imam Umer Ahmed Ilyasi
सरसंघचालक मोहन भागवतांनी मशिदीत घेतली इमाम इलियासी यांची भेट

नवी दिल्ली: मुस्लिम समुदायाशी संपर्क साधत, संघाचे प्रमुख मोहन भागवत RSS chief Mohan Bhagwat यांनी गुरुवारी संघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांसह अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी Imam Umer Ahmed Ilyasi यांची भेट घेतली.

कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत बंद दाराआड ही बैठक तासाभराहून अधिक काळ चालली. भागवत यांच्यासोबत संघाचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि इंद्रेश कुमार होते.

  • Delhi | RSS chief Mohan Bhagwat held a meeting with Dr Imam Umer Ahmed Ilyasi, Chief Imam of All India Imam Organization, at Kasturba Gandhi Marg mosque today pic.twitter.com/vxfo0IPsMa

    — ANI (@ANI) September 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी मुस्लिम विचारवंतांशी चर्चा करत आहेत. "RSS सरसंघचालक हे सर्व स्तरातील लोकांना भेटतात. हा सततच्या सामान्य 'संवाद' प्रक्रियेचा एक भाग आहे," असे RSS प्रचारप्रमुख सुनील आंबेकर म्हणाले.

येत्या काही दिवसांत संघप्रमुख मोहन भागवत काश्मीरमधील काही मुस्लिम नेत्यांचीही भेट घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. काश्मीरमध्ये निवडणुकीचे राजकारण पुन्हा सुरू झाल्यानंतर खोऱ्यात शांतता राखण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे मानले जात आहे. काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांना खोऱ्यात पुन्हा सक्रिय होण्यापासून रोखण्यात आणि काश्मिरी तरुणांना नव्या भारताशी जोडण्यात हे नेते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.