दिल्लीत जोरदार पाऊस, मोडला 19 वर्षांचा रेकॉर्ड

author img

By

Published : Sep 2, 2021, 9:18 AM IST

record-rain-from-last-two-days-IMD issued orange alert in-delhi

भारतीय हवामान खात्याच्या मते, दिल्लीच्या लोधी रोडमध्ये गेल्या 30 तासांत 196 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सफदरजंग वेधशाळेत 188.6 मिमी, रिज 133.6 मिमी, आया नगर 114.6 मिमी, पालम 192.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली - सप्टेंबर महिन्यात झालेल्या मान्सूनच्या पावसाने गेल्या 19 वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या मते, दिल्लीच्या लोधी रोडमध्ये गेल्या 30 तासांत 196 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सफदरजंग वेधशाळेत 188.6 मिमी, रिज 133.6 मिमी, आया नगर 114.6 मिमी, पालम 192.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

गेल्या 27 तासांत राजधानी दिल्लीत 190 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर, हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासात दिल्लीत मुसळधार पाऊस पडू शकतो. या व्यतिरिक्त, हवामान विभागाच्या मते, गेल्या 24 तासांदरम्यान झालेल्या पावसाने आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसाचा पाचव्यांदा विक्रम मोडला आहे.

हवामान खात्याच्या मते, सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी झालेल्या पावसाने गेल्या 19 वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे. मुसळधार पावसाचा हवामान विभागाने आधीच अलर्ट जारी केला होता. आता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी किमान तापमान 24 अंश आणि कमाल तापमान 29 अंश नोंदवले गेले आहे. हवामान खात्याच्या मते 2 सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आज दिल्लीत कमाल तापमान 31 अंश आणि किमान तापमान 25 अंश राहण्याचा अंदाज आहे.

थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता -

दिल्लीतील अनेक भागात झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी किरकोळ अपघातांचीदेखील नोंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहतूक ठप्प झाली आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी वाहनांसाठी नियमावली जाहीर केली असून पावसामुळे नागरिकांना अलर्टही जारी केला आहे. पावसामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांसह महाआघाडीचे नेते राज्यापालांच्या भेटीला.. 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.