ETV Bharat / bharat

Top News Today : आज दिवसभरात काय असणार महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 1, 2022, 7:13 AM IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (Read Top News Today )

Top News Today
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा

मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा 1 नोव्हेंबर हा दिवस या भागात काळा दिवस म्हणून पाळला जातोय, आजच्याच दिवशी झाली 'या' सहा राज्यांची स्थापना, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी या विशेष घडामोडी (Marathi News) आहेत.

मुंबईचा गड आला, पण बेळगावचा सिंह मात्र गेला : देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशात भाषावार प्रांतरचना करण्यात आली, त्या-त्या भाषेच्या लोकांची राज्यं स्थापन झाली. पण स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊन झाले. तरीही बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाग मात्र आजही कर्नाटकात (Maharashtra-Karnataka Dispute) खितपत पडला आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्यावेळचं म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटक राज्याची स्थापना झाली आणि 865 मराठी खेडी त्यात डांबली गेली. नंतरच्या काळात आपण लढून मुंबईचा गड मिळवला. पण बेळगावचा (Belgaum) सिंह मात्र गमावला. आजही या भागातल्या मराठी भाषकांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवला आहे. 1 नोव्हेंबर हा दिवस बेळगाव आणि सीमा भागात काळा दिवस म्हणून पाळला जातोय.

आजच्याच दिवशी झाली 'या' सहा राज्यांची स्थापना : 1 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक राज्यांच्या निर्मितीचा इतिहास आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी मध्य प्रदेशची स्थापना झाली. जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सहावे मोठे राज्य आहे. 1 नोव्हेंबर 1966 रोजी भाषेच्या आधारावर हरियाणाची निर्मिती झाली. हा पूर्वी पूर्व पंजाबचा भाग होता.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Politics) राज्यात उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या संदर्भात सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती.

विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच अफगाणिस्तान संघातला स्टार सलामीवीर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर : टी 20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तान संघाचा स्फोटक सलामीवीर हजरतुल्ला झझाई (Hazratullah Zazai) दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. निम्म्याहून अधिक स्पर्धा अजून शिल्लक असताना हसरतुल्ला संघाबाहेर गेल्याने अफगाणिस्तान संघाला मोठा तोटा झाला आहे.

मन कस्तुरी रे चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला : मन कस्तुरी रे चा (Mann Kasturi Re) जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटातील रंग लागला (Rang Lagla) हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनयमध्ये नव्यानं हळुवार फुलत जाणारं प्रेमाचं नातं दिसत आहे. कॉलेजमधील बहरत जाणारं प्रेम, धमाल या गाण्यामध्ये दिसून येतेय. शोर यांनी या गाण्याला संगीत, शब्दबद्ध केले असून आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून अनुभवता येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.