ETV Bharat / bharat

Petrol Diesel Rates Today : इंधन दरात वाढ की कपात ? जाणून घ्या आजचे दर

author img

By

Published : Dec 31, 2022, 7:08 AM IST

Petrol Diesel Rates Today
पेट्रोल डिझेलचे आजचे दर

पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर (Petrol Diesel Rates) ठरतात. महागाईमधील चढ उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ठरवित असतात. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष (Petrol Rates Today) असते.

मुंबई : इंधनाच्या किमती ( Petrol Diesel ) या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर अवलंबून ( petrol diesel rates today) असतात. कारण, आपण बहुतांश इंधन हे आयात करतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल 61 डॉलर प्रती बॅरल पर्यंतवर गेले आहे. त्यामुळे देशात इंधनाच्या किंमती वाढत आहेत. इंधनावरच्या करांबद्दल म्हणाल तर केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकार इंधनावर कर लावत असतात. करातून सरकारांना महसूल मिळतो. विकासाची गरज लक्षात घेऊन हे कर लावले जातात. जेव्हा गरज वाटली तेव्हा दरवेळी केंद्राने इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली ( petrol diesel rates today 31 December 2022 ) आहे.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

इंधनाचे दर नियंत्रित : तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या ( Petrol Diesel Rates Today in Maharashtra ) आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 76 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 26 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 73 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 22 पैसे (Diesel Rates Today) आहे.

Petrol Diesel Rates Today
पेट्रोल डिझेलचे आजचे दर

इंधनाच्या किंमती का वाढत आहेत ? इंधनाच्या किमती आपल्याकडे का वाढत आहेत, याचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. आणि त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या किमती 55 ते 60 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्यात.त्यामुळे प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दरही वाढलेत आणि भारतात तर मागणीच्या 85 टक्के इंधन आपण परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम आपल्याला भोगावा लागतो (Petrol Rates Today) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.