ETV Bharat / bharat

Vijayawada Crime News : लग्नाच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, फेसबूकवर झाली होती ओळख

author img

By

Published : Feb 17, 2023, 11:06 AM IST

आंध्र प्रदेशच्या सूर्यरावपेटा येथे लग्नाच्या नावाखाली महिलेवर बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. फेसबूकच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती.

Rape
बलात्कार

सूर्यरावपेटा (आंध्र प्रदेश) : बुधवारी रात्री आंध्र प्रदेशच्या सूर्यरावपेटा पोलिसांनी लग्न करणार असल्याचे भासवून एका महिलेची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरुद्ध एफआयआर नोंदवला. विजयवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुंटूर येथे घडली असून पीडित मुलगी सूर्यारावपेटा येथे काम करत होती.

2019 मध्ये फेसबुकवर ओळख : गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली मंडल येथील एक तरुणी (22) काही काळापूर्वी विजयवाडा येथे एका कपड्याच्या दुकानात काम करत होती. 2019 मध्ये तिची फेसबुकवर एम. रमेश बाबू नावाच्या तरुणाशी ओळख झाली. तो तिच्या मागे हात धूऊन लागला होता. मात्र तरुणीने दुसऱ्या तरुणाशी लग्न केले. नंतर तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर एकदा तिला सूर्यरावपेट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रक्रियेत रमेश बाबू पुन्हा तिच्याशी संपर्कात आला.

बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल : गेल्या महिन्याच्या १४ तारखेला रमेश बाबू या तरुणीला गुंटूर बसस्थानकाजवळ त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडे घेऊन गेला. आपण जोडपे आहोत असे सांगून ते दोन दिवस तिथे राहिले. या वेळी दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध घडून आले. त्याने १६ जानेवारी रोजी महिलेला विजयवाडा येथे सोडले आणि लग्नास नकार दिला. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने सूर्यरावपेट येथे पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यापूर्वी एफआयआर नोंदवला होता. नंतर, युवती सूर्यरावपेटा पोलिस ठाण्यात हजर असल्याने तेथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

उत्तराखंडमध्ये बापाचा मुलीवर बलात्कार : आई बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत नराधमाने आपल्या 11 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तराखंडमधील रामनगर येथे ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाच्या मुसक्या आवळत त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी ठोठावली आहे. पोलिसांनी बापावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. रामनगर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : Rape Attempt with Footballer: महिला फुटबॉल खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न.. फिरायला निघाली अन् नराधमाने शेतातच ओढले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.