नवी दिल्ली Rape Case In Delhi : देशाची राजधानी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीये. या प्रकरणी नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलाय. नवी दिल्लीचे डीसीपी देवेश कुमार महाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेनं एका खासगी कंपनीच्या सीईओवर आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांकडून महिलेची वैद्यकीय चाचणी : देवेश कुमार महाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी भारतीय वंशाच्या एका अमेरिकन महिलेनं चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अनेक आरोप केले आहेत. तिने सांगितले की, वर्षभरापूर्वी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीच्या सीईओने तिच्यावर बलात्कार केला होता. सध्या पोलिसांनी महिलेचे मेडिकलही करून घेतले आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. महिलेचे वय 42 वर्षे आहे. महिला सीईओच्या संपर्कात कशी आली? याचाही तपास पोलीस करत आहेत.
7 वर्षांपूर्वीही एक प्रकरण समोर आलं होतं : सात वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये एका अमेरिकन महिलेने बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. ती भारत भेटीसाठी आली होती. या महिलेने टुरिस्ट गाईडसह पाच जणांवर आरोप केले होते. अमेरिकेत परतल्यानंतर तिनं ई-मेलद्वारे दिल्ली पोलिसांकडे ही तक्रार केली होती. ती दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबली असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. भारताचा दौरा करण्यासाठी एका पर्यटक मार्गदर्शकानं तिच्याशी संपर्क साधला. एक दिवस गाईड चार मित्रांसह हॉटेलमध्ये आला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप होता. बलात्काराच्या या घटनेने दिल्ली पुन्हा एकदा हादरली होती.
हेही वाचा: