Raju Srivastava Funeral: आज राजू श्रीवास्तव पंचतत्वात होणार विलीन.. चाहते दु:खात बुडाले

author img

By

Published : Sep 22, 2022, 11:05 AM IST

Raju Srivastava Funeral

Raju Srivastava Funeral: राजू श्रीवास्तव अंत्यसंस्कार: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्त यांच्यावर आज दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Raju Srivastava Last Rites today in Delhi

दिल्ली: Raju Srivastava Funeral: आपल्या अप्रतिम कॉमेडीने घरोघरी लोकांना आनंदाश्रू देणारे 'गजोधर भैय्या' राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्काराची आज (२२ सप्टेंबर) दिल्लीत तयारी सुरू Raju Srivastava Last Rites today in Delhiआहे. राजू यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाट येथे कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रासह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

राजूने 42 दिवस आजाराशी झुंज दिली : 42 दिवस हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल असताना 21 सप्टेंबर रोजी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये राजू यांचा मृत्यू झाला. राजूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा राय पतीच्या जाण्याने पूर्णपणे तुटली आहे. शिखाला आशा होती की ते बरे होऊन परत येतील.

21 सप्टेंबरला काय घडले? मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या मेव्हण्याने 21 सप्टेंबरला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितले की, बुधवारी (21 सप्टेंबर) राजूची प्रकृती खालावली होती. या दिवशी राजूचा रक्तदाब अचानक कमी होऊ लागला. अशा परिस्थितीत राजूला CPR (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) देण्यात आले. यानंतर त्याचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.