ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना लोकंचा चांगला प्रतिसाद; प्रियांका गांधीही लवकरच होणार सहभागी

author img

By

Published : Sep 10, 2022, 5:40 PM IST

सध्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसने शनिवारी (9 सप्टेंबर)रोजी दावा केला, की राहुल गांधी यांच्या सहभागामुळे 'भारत जोडो यात्रे'ला मोठ्या प्रमाणात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रियांका गांधी-वड्रा देखील 19 सप्टेंबर दरम्यान यात्रेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra

कन्याकुमारी (तमीळनाडु) - काँग्रेस नेत्यांनी 'भारत जोडो यात्रे'च्या चौथ्या दिवशी कन्याकुमारी येथील मुलागुमुडू येथून पुढचा प्रवास सुरू केला. आज संध्याकाळपर्यंत केरळमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी भारताच्या अखंडतेसाठी हा प्रवास सुरू केला आहे. तत्पूर्वी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, 'भारत जोडो यात्रा' हा भाजप आणि आरएसएसने केलेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आहे. आमच्यासाठी ही यात्रा लोकांशी जोडण्यासाठी आहे. भाजपच्या विचारसरणीमुळे या देशाचे जे नुकसान झाले आहे, त्याविरोधात आम्ही ही यात्रा काढली आहे," असे ते म्हणाले. "भाजपने देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवून त्यांच्यावर दबाव आणला आहे. आम्ही आता राजकीय पक्ष म्हणून लढत नाही. तर, एक विचार म्हणून लढत आहोत.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही भाऊ राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांनी 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान केरळमधील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. (Priyanka Gandhi will participate Bharat Jodo yatra ) काँग्रेसची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.

आपल्या देशातील ४२ टक्के तरुण बेरोजगार आहेत. तरुणांचे भविष्य असुरक्षित असेल तर भारताचे भविष्य सुरक्षित असू शकते का? ही यात्रा त्या बेरोजगार तरुणांसाठी आहे, त्यांच्या नोकऱ्यांसाठी आम्ही ही यात्रा करत असल्याचे राहुल म्हणाले आहेत. तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत 3,570 किमी असेल. 5 महिने चालणारा हा प्रवास 12 राज्यांमधून जाणार आहे.

चौथ्या दिवसाच्या दौऱ्यात राहुल गांधी सेंट मेरी मॅट्रिक शाळेतील लहान मुलांमध्येही पोहोचले. त्याचवेळी, काँग्रेस नेते भाजपची हेट फॅक्टरी एक खोडसाळ ट्विट व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑडिओमध्ये जे रेकॉर्ड केले आहे त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. ही भाजपची टिपिकल फालतू पद्धत आहे. भारत जोडो यात्रेची यशस्वी सुरुवात आणि त्यांना लोकांकडून मिळत असलेला पाठिंबा पाहून ते निराश झाले आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 150 दिवस चालणार आहे. ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीपासून सुरू होईल आणि जम्मू-काश्मीरपर्यंत 3,570 किमी असेल. त्यात 118 नेत्यांचा समावेश असेल. हा प्रवास दररोज सुमारे 25 किमी असेल. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीदरम्यान राहुल गांधी जेव्हा प्रचार करतील, त्यावेळी यात्रा १-२ दिवस थांबू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.