ETV Bharat / bharat

Rahul Gandhi ED inquiry: राहुल गांधी यांची आजची 'ED' चौकशी संपली; उद्याही होणार चौकशी

author img

By

Published : Jun 14, 2022, 9:25 AM IST

Updated : Jun 14, 2022, 9:35 PM IST

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज मंगळवार (दि. 14 जुन)रोजी सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर झाले होते. ( Rahul Gandhi ED inquiry )त्यांची सुमारे 10 तास चौकशी झाली. त्यानंतर ते रात्री 9:15 वाजता त्यांची आजची ईडी चौकशी संपली.

राहुल गांधींची आजही ईडी करणार पुन्हा चौकशी
राहुल गांधींची आजही ईडी करणार पुन्हा चौकशी

नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशी झाली. काल दिवसभरात सुमारे साडेआठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, राहुल गांधी यांची आज मंगळवार (दि. 14 जुन)रोजी सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED)चौकशी झाली. ( Rahul Gandhi ED Inquiry Is Over Today ) राहुल गांधी यांची आज सुमारे 10 तास चौकशी झाली. त्यानंतर ते रात्री 9:15 वाजता ईडी कार्यालयातुन बाहेर पडले आहेत. दरम्यान, राहुल गांधी उद्या (दि. 15 जुन )रोजीही चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

  • Enforcement Directorate asks Congress leader Rahul Gandhi to rejoin the National Herald investigation tomorrow for the third consecutive day: Sources

    (file pic) pic.twitter.com/a2vpzyqtCt

    — ANI (@ANI) June 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आंदोलक काँग्रेस नेत्यांची धरपकड - नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी झाली. त्याचवेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी अकबर रोडवरील मुख्यालयाकडे रवाना झाले. मात्र ते सर्वजण इंडिया गेट सर्कलमध्ये पोहोचताच तेथे आधीच तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी कोणालाही अकबर रोडच्या दिशेने जाऊ दिले नाही. काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व अन्य पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यात पाठवले. पोलीस कोठडीत घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, दीपेंद्र हुडा, रणजीत रंजन, सुरजेवाला आदींचा समावेश आहे.

काल दिवसभरात काय घडले - राहुल गांधी यांना जेवणासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर राहुल सोनीया गांधी ज्या गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी आई सोनीया यांच्या तब्येतीची चौकशी केली. सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनीया गांधी यांना कोरोनाच्या त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड
काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

जेवनानंतर राहुल गांधी पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले. यामध्ये राहुल यांना आणखी चौकशी झाली. दरम्यान, काँग्रेसने देशभर मोदी सरकारविरोधात आणि ईडीविरोधात आंदोलन पुकारले. यामध्ये काँग्रेसने लोकशाही धोक्यात आहे. राजकीय वैमनस्यातून ही कारवाई सुरू आहे असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण - नॅशनल हेराल्ड प्रकरण (2012)मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसच्या (2000)कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.

राहुल आणि सोनिया 2015 पासून जामिनावर - सर्वोच्च न्यायालयाने (2015)मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना या प्रकरणी लवकर सुनावणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले होते. (19 डिसेंबर 2015)रोजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. (2016)मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिला आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली.

ईडी कारवाईवरुन दिल्लीत बॅनरबाजी - राहुल गांधी यांच्या ईडी कारवाईवर दिल्लीत ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि शशी थरुर यांनी मोदी सरकारला भीती वाटत असल्याचं सांगत निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तर भाजपच्या सदस्य किंवा ज्या राज्यांत भाजपची सत्ता आहे तिथे पोहोचत नाही, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Vikhe Patil on Ajit Pawar : अजित पवारांनी पुन्हा आमच्या सोबत यावे - भाजप नेते विखे पाटील

Last Updated : Jun 14, 2022, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.