ETV Bharat / bharat

Firing In Jamshedpur Court: जमशेदपुरमध्ये न्यायालयाच्या परिसरात गोळीबार! गुन्हेगारांचे पोलिसांना खुले आव्हान

author img

By

Published : Mar 27, 2023, 9:10 PM IST

Firing In Jamshedpur Court
Firing In Jamshedpur Court

शहरात भरदिवसा गोळीबाराच्या दोन घटना घडवून गुन्हेगारांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. दुसरीकडे न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पोलिसांनी दोन्ही गोळीबार प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.

जमशेदपूर (झारखंड) : दिवाणी न्यायालयाच्या गेटवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षेच्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांचे सुरक्षेचे सर्व दावे फोल ठरवत गुन्हेगारांनी जमशेदपूर न्यायालयाच्या गेटजवळ सोमवारी दुपारी गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता. त्याचवेळी अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यानंतर लोक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर न्यायालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

गोलमुरी येथील टिनप्लेट चौकाजवळही गोळीबार : न्यायालयाच्या गेटजवळ भरदिवसा गोळीबार केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास गोलमुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिनप्लेट चौकात गुन्हेगारांनी हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लागोपाठ दोन गोळीबाराच्या घटनांमुळे जमशेदपूर पोलिसांची झोप उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मनप्रीत खून खटल्यातील साक्षीदारावर गुन्हेगारांनी गोळीबार केला: सोमवारी, पहिली घटना जमशेदपूर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीनजवळ घडली जेव्हा मनप्रीत पाल खून प्रकरणात नवीन सिंग न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात होता. नवीन तसेच न्यायालयाच्या गेटवर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक या घटनेत थोडक्यात बचावले असले, तरी दुचाकीस्वारही घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस तपासात गुंतले : दुसरीकडे गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस न्यायालयाच्या आजूबाजूला लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहेत.

घरात घुसून मनप्रीतची हत्या : गेल्या वर्षी ८ जूनला मनप्रीत पाल सिंगही एका प्रकरणात साक्ष देण्यासाठी कोर्टात गेला होता. त्याला साक्ष न देण्याची धमकीही देण्यात आली. कोर्टात साक्ष देऊन मनप्रीत घरी परतत असताना गुन्हेगारांनी त्याच्यावर हल्ला केला, पण कसा तरी आपला जीव वाचवण्यात यश मिळवून तो सिद्धगोरा येथील शिवसिंग बागान येथील आपल्या घरी परतला. जिथे गुन्हेगारांनी घरात घुसून, आईसमोरच त्याचा खून केला.

मनप्रीत हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक : घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी तत्परतेने कारवाई केली आणि घटनेच्या चार दिवसांनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून, तुरुंगात पाठवले. दुसरीकडे, या घटनेतील एक आरोपी पूरण सिंग अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही.

हेही वाचा : Sadhvi Prachi : विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांचे राहुल गांधींबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.