ETV Bharat / bharat

पंजाबमध्ये धुक्याचा कहर! रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला बसची धडक ; चार पोलिसांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 1:46 PM IST

Four Policeman killed in a bus accident
रस्त्यावर उभी असलेली गाडी न दिसल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात

Policemen killed in accident : पंजाबमध्ये पोलिसांची बस ट्रॉलीवर आदळून झालेल्या अपघातात चार पोलिसांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या घटनेत 10 जण जखमी झालेत. जालंधर-पठाणकोट महामार्गावरील एमा मंगट या गावाजवळ हा अपघात घडलाय.

होशीपूर (पंजाब) : Policemen killed in accident जालंधर-पठाणकोट महामार्गावरील एमा मंगट या गावाजवळ आज (17 जानेवारी) रोजी सकाळी 6 वाजता पंजाब पोलिसांची बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. या अपघातात तीन पोलिसांचा मृत्यू झाला. तर, 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मुकेरियन, दसूया आणि जालंधर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

बस गुरुदासपूर ड्युटीला जात होती : पठाणकोटचे एएसआय कुलविंदर सिंग यांनी सांगितलं की, त्यांचं गाव जवळच आहे. गुरुद्वारा साहिबला जात असताना एका नातेवाईकाचा फोन आला, की पंजाब पोलिसांच्या बसला अपघात झाला. त्यानंतर घटनास्थळी भेट दिली. तेव्हा इतर लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आलं. यामध्ये एका महिला पोलिसासह 4 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. ही बस जालंधर पीएपी येथून गुरुदासपूरला ड्युटीला जात होती, अशी माहितीही सिंग यांनी यावेळी दिली.

गुरदासपूरला जात होती बस : मिळालेल्या माहितीनुसार, जालंधरहून ही बस सैनिकांना घेऊन जाणारी बस गुरुदासपूरला जात होती. एम्मा मांगट या गावात पोहोचल्यावर दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्यानं चालकाला रस्त्यावर उभा असलेला ट्रेलर दिसला नाही. बस ट्रेलवर आदळली. या अपघातात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना मुकेरियन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

चालकाचा मृतदेह ढिगाऱ्यातून काढला : काही गंभीर जखमी पोलिसांना दसुहा आणि जालंधरच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. बसचा चालक दोन वाहनांमध्ये अडकला होता. त्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बसमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य दोन कर्मचाऱ्यांना मुकेरियन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आलं. एसएसपी सुरेंद्र लांबा म्हणाले की, दाट धुक्यामुळे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा :

1 "मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही, मला त्यात रस नाही", अयोध्या वादावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

2 महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ: सरकारी बंगला खाली न केल्यानं पुन्हा मिळाली नोटीस

3 दिल्लीतील दाट धुक्याचा रेल्वे, विमान सेवेला जोरदार फटका, तब्बल तीस तास प्रवाशाला झाला उशीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.