दिल्ली- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचे आरोप लावल्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंंतर पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांचा खुलासा केला आहे. तर आज सायंकाळी शरद पवार यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थान 6, जनपथ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची बैठक बोलावली आहे.
- पत्रकाराचा प्रश्न- अनिल देशमुख राजीनामा देणार का? पदावर असताना ते चौकशीवर परिणाम पाडू शकतात?
५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी अनिल देशमुख कोरोना झाला असल्याने विलिगिकरणात होते. यासंदर्भात रुग्णालयाचे सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. अशा वेळी ते मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना कसे काय भेटू शकतात. हे शक्य नाही. त्यामुळे अनिल देशमुखांना राजीनामा देण्यास सांगता येणार नाही असे उत्तर पवार यांनी दिले.
- पत्रकाराचा प्रश्न- १५ फेब्रुवारीला अनिल देशमुखांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले होते, असे ट्विट भाजप नेते मालविय यांनी केले आहे, यावर तुम्ही काय सांगाल?
यासंदर्भात माझ्याकडे काही माहिती नाही. पण पत्रकार परिषद त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली होती, अशी माहिती मिळत आहे. सध्या माझ्याकडे रुग्णालयाचे प्रमाणपत्र आहे. त्यावर मी विश्वास ठेवतो. त्याप्रमाणे ते विलिगिकरणात होते, हे सिद्ध होते. असे पवार म्हणाले.
- पत्रकाराचा प्रश्न- अनिल देशमुख आणि परमबिरसिंग यांची भेट झालीच नाही असे म्हणता येईल का?
एक गोष्ट लक्षात घ्या, मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसने महत्त्वपूर्ण तपास केला आहे. प्रमुख आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले आहेत. या प्रकणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी परमबिरसिंग यांच्या आरोपांना महत्त्व दिले जात आहे. असे व्हायला नको. हिरेन प्रकरणातील पोलिसांनी केलेला तपास महत्त्वाचा आहे. त्यावर आपण भर द्यायला हवा. असेही शरद पवार म्हणाले.
- पत्रकाराचा प्रश्न- परमबीर सिंग यांच्या पत्राचा मुद्दा बाजूला ठेवला तरी अँटिलिया स्फोटके प्रकरणी अनिल देखमुख यांचा राजीनामा घ्यायला हवा असे नाही वाटत का?
अँटिलिया प्रकरणी जबाबदारी घटनात्मक प्रमुखाची आहे. त्यात अनिल देशमुख यांचा संबंध नाही. तसेच परमबीर सिंग प्रकरणी महाविकास आघाडीत दोन गट असल्याचे वृत्तही तथ्यहीन आहे. असे काहीही नाही. आमचे सरकार भक्कम असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.
- पत्रकाराचा प्रश्न- परमबीर सिंग आणि अनिल देखमुख यांची भेट ४ फेब्रुवारीला झाल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही दिलेली तारिख ही ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी अशी आहे?
शरद पवारांचे उत्तर- तसे नाही. परमबीर सिंग यांनी पत्रात फेब्रुवारीच्या मध्यात भेट झाल्याचा उल्लेख केला आहे. ४ फेब्रुवारी ही तारीख चूकीची आहे. त्यावरुन मी तुमच्याशी बोलतोय. परबीर सिंग यांनी उल्लेख केलेल्या तारखेच्या संदर्भात माझ्याकडे ही माहिती आहे. तसे असेल तर आतापर्यंत ते गप्प का बसले. त्यांनी यापूर्वीच याचा गोप्यस्फोट करायला हवा होता असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.