ETV Bharat / bharat

Prashant Kishor meet Soniya Gandhi : प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची दाट शक्यता; दुसऱ्यांदा सोनिया गांधींच्या भेटीला

author img

By

Published : Apr 19, 2022, 2:06 PM IST

Updated : Apr 19, 2022, 7:53 PM IST

प्रशांत किशोर आणि सोनिया गांधी यांची ( Prashant Kishor Sonia Gandhi Meeting ) आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. प्रशांत कुमार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे राजकीय पेच निर्माण होण्याची चिन्हे मानली जात आहेत. प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ( 2024 congress loksabha strategy काँग्रेससमोर मांडली आहे.

प्रशांत किशोर सोनिया गांधी
प्रशांत किशोर सोनिया गांधी

नवी दिल्ली - प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 16 एप्रिल रोजी सोनिया गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर दोघांची भेट पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रशांत किशोर आणि सोनिया गांधी यांची आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. प्रशांत कुमार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे राजकीय पेच निर्माण होण्याची चिन्हे मानली जात आहेत. प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती काँग्रेससमोर मांडली आहे. मात्र, विशेष म्हणजे त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम न करण्याची देखील घोषणा केली आहे. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये त्यांची भूमिका काय असेल यावरील साशंकता कायम आहे.

काँग्रेस प्रवेशाची व्यक्त केली इच्छा - निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर (पीके) यांनी संयुक्त राष्ट्रांमध्येही काम केले आहे. किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 16 एप्रिल रोजी वरिष्ठ नेत्यांसमोर पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. सोनिया गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के.सी. वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य काही नेते उपस्थित होते. पीके यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची ब्लू प्रिंट काँग्रेससमोर मांडली. त्यांनी मांडलेल्या योजनेवर विचार करण्यासाठी पक्ष नेत्यांचा एक गट तयार करेल, जो एका आठवड्यात आपला अहवाल सोनिया गांधींना सादर करेल. किशोर यांच्या निवडणुकीची रणनीती आणि त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याबाबत काँग्रेस नेतृत्व लवकरच निर्णय घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Swamy On Modi : स्वामींचा प्रहार! म्हणाले, पंतप्रधान मोदी आर्थिक विकासात अपयशी

आठवडाभरात अहवाल सादर - सोनिया आणि प्रशांत किशोर यांच्या १६ एप्रिलला झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले होते, लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीचे सविस्तर सादरीकरण केले. पक्षाचा एक गट त्यांनी मांडलेल्या योजनेवर विचार करेल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात काँग्रेस अध्यक्षांना सादर करेल. त्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. किशोर हे काँग्रेससाठी कोणत्या भूमिकेत काम करतील, असे विचारले असता, वेणुगोपाल म्हणाले की, एका आठवड्यात सर्व माहिती समोर येईल. तर किशोर म्हणाले की, "कोणत्याही महत्त्वाकांक्षेशिवाय" मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. त्यांना काही नको, पण त्यांची योजना राबवली पाहिजे, जेणेकरून काँग्रेस तळागाळात मजबूत होईल.

हेही वाचा - Vegetable Prices : वाढत्या महागाईला इंधना पाठोपाठ भाज्यांचीही फोडणी; भाज्या दुपट्टीने वाढल्या

गुजरात निवडणुकीवर लक्ष - सूत्रांचे म्हणणे आहे की, काँग्रेस नेतृत्वासमोर पुढील लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये काँग्रेसची मीडिया रणनीती बदलणे, संघटना मजबूत करणे आणि ज्या राज्यांमध्ये काँग्रेस भाजपची सत्ता आहे त्या राज्यांवर विशेष लक्ष देण्यावर भर देण्यात आला आहे. प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या योजनेवर अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. किशोर यांनी काँग्रेसमध्ये जावे, असे मत पक्षात आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, गेल्या अनेक आठवड्यांपासून पक्ष नेतृत्व आणि किशोर यांच्यात प्रामुख्याने गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे. गुजरातचा सुप्रसिद्ध पाटीदार चेहरा नरेश पटेल यांनाही सोबत घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

Last Updated : Apr 19, 2022, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.