ETV Bharat / bharat

Porn Film Case : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात शर्लिन चोप्राला दिलासा.. सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

author img

By

Published : Feb 4, 2022, 3:29 PM IST

शर्लिन चोप्रा
शर्लिन चोप्रा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ( Actress Shilpa Shetty ) पती राज कुंद्रा याच्या पॉर्न फिल्म रॅकेट ( Raj Kundra Porn Film Racket ) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला ( SC Grants Pre-Arrest Bail To Sherlyn Chopra ) आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ( Actress Shilpa Shetty ) पती राज कुंद्राचा समावेश असलेल्या पॉर्न फिल्म्स रॅकेट ( Raj Kundra Porn Film Racket ) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राला अटकपूर्व जामीन मंजूर केला ( SC Grants Pre-Arrest Bail To Sherlyn Chopra ) आहे.

चोप्रावर कोणतीही जबरदस्तीने कारवाई केली जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने याच प्रकरणात कुंद्रा आणि मॉडेल पूनम पांडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

शर्लिनतर्फे वकील सुनील फर्नांडिस यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. अंतरिम जामिनावर असताना शर्लिनने यापूर्वी तिला दिलेल्या अंतरिम जामिनाच्या सवलतीचा गैरवापर केलेला नाही. एफआयआरमध्ये चोप्रावर फक्त एकच आरोप आहे की, तिने काही वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अश्लील व्हिडिओ क्लिपमध्ये कथित कृत्य केले आहे, असेही वकिलांनी न्यायालयात सांगितले.

ज्या वेबसाइट्सवर अश्लील व्हिडिओ क्लिप आढळून आल्या आहेत त्या फ्रान्स आणि कॅनडामधील मूळ परदेशी कंपन्या आहेत. आणि शर्लिनचे त्यांच्याशी कोणताही संबंध / नियंत्रण / वर्चस्व नाही. कोणताही असत्यापित वापरकर्ता किंवा व्यक्ती त्या साईटवर कोणताही व्हिडिओ अपलोड करू शकतो, अशीही बाजू वकिलांनी न्यायालयात मांडली.

शर्लिनच्या याचिकेत म्हटले आहे की, अॅपवर उपलब्ध असलेल्या सामग्रीच्या प्रकाशनात किंवा प्रसारणात ती गुंतलेली नव्हती. तिला सामग्रीच्या संभाव्य गैरवापराबद्दल माहिती नव्हती आणि जेव्हा एफआयआर दाखल करण्यात आला तेव्हाच तिला त्याच्या गैरवापराबद्दल कळले. शर्लिनने तपासात सक्रियपणे मदत केली आहे आणि तपास अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानुसार सर्व माहिती दिली आहे. तिच्याकडून आता कुठलीही माहिती घेणे बाकी राहिलेले नाही, असेही शर्लिनच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने तिला हे संरक्षण दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.