ETV Bharat / bharat

Senthil Balaji : ईडीची धाड पडल्यानंतर 'हे' मंत्री ढसाढसा रडले..जाणून घ्या कोण आहेत सेंथिल बालाजी

author img

By

Published : Jun 14, 2023, 9:40 PM IST

द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या अटकेवरून राजकारण तापले आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीनेही त्यांच्या कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, रुग्णालयाने त्यांना बायपास सर्जरीचा सल्ला दिला आहे.

POLITICS ON ARREST OF SENTHIL BALAJI
सेंथिल बालाजी यांच्या अटकेवरून राजकारण

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या अटकेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ईडीने त्यांना आज अटक केली. अटकेनंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना बायपास सर्जरीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने सेंथिल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ईडीने अधिक चौकशीसाठी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या अटकेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. बालाजींच्या समर्थनार्थ काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे, तर अण्णाद्रमुकने बालाजींना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

  • #WATCH | Tamil Nadu Electricity Minister V Senthil Balaji breaks down as ED officials took him into custody in connection with a money laundering case and brought him to Omandurar Government in Chennai for medical examination pic.twitter.com/aATSM9DQpu

    — ANI (@ANI) June 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अटक केल्यानंतर रडू कोसळले : ईडीने जेव्हा त्यांना अटक केली तेव्हाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत बालाजी रडताना दिसत आहेत. त्यावर अण्णाद्रमुकने म्हटले की, ते नाटक करत आहेत. ज्येष्ठ नेते डी जयकुमार म्हणाले की, बालाजी एक दिवसापूर्वीपर्यंत पूर्णपणे निरोगी होते. परंतु ज्या दिवशी ईडीने छापा टाकला त्याच दिवशी त्यांची तब्येत कशी बिघडली? पक्षाचे सरचिटणीस ई पलानीस्वामी यांनीही ते नाटक करत असल्याचे म्हटले.

  • State minister Senthil Balaji underwent Coronary Angiogram today; Bypass surgery is advised at the earliest: Tamil Nadu Government Multi Super Speciality Hospital, Chennai pic.twitter.com/UgGmMz6Wcd

    — ANI (@ANI) June 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अटकेवरून विरोधकांचा सरकारवर निशाणा : मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सेंथिल बालाजी यांच्या अटकेला घटनाबाह्य म्हटले आहे. त्यांनी आपल्या निवासस्थानी सर्व ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. स्टॅलिन म्हणाले की, या विरोधात ते कायदेशीररित्या लढतील. डीएमकेला काँग्रेससह अन्य पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेसने याला राजकीय छळ म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, जो कोणी मोदी सरकारला विरोध करतो, त्याच्यावर सूडाच्या भावनेने कारवाई केली जाते. तसेच टीएमसीनेही केंद्र सरकारचा निषेध केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याला राज्य सरकारला त्रास देण्यासाठी उचललेले पाऊल म्हटले आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीही यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

  • It's absolutely shocking. When they've their own govt in the state&Centre, then it becomes 'double-engine' govt. But when another party is ruling in the state&BJP in Centre, it becomes a 'double barrel' govt. They use ED&CBI: Kapil Sibal on ED action on TN minister Senthil Balaji pic.twitter.com/OEnlLDLAM4

    — ANI (@ANI) June 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे हे प्रकरण? : ईडीने मंगळवारी सेंथिल बालाजींच्या विरोधात छापा टाकला होता. त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगची तक्रार करण्यात आली होती. त्यांच्यावर नोकरीसाठी रोख रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. ईडीने चेन्नई, इरोड आणि करूर येथे छापे टाकले. सेंथिल 2011 ते 2016 दरम्यान अण्णाद्रमूक मध्ये होते. त्यावेळी ते परिवहन मंत्री होते. त्यादरम्यान हा घोटाळा झाला. सेंथिल त्यानंतर द्रमुकमध्ये सामील झाले. बालाजी ईडीच्या समन्सविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते, पण त्यांची याचिका फेटाळण्यात आली.

कोण आहे सेंथिल बालाजी? : 47 वर्षीय बालाजींचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. ते चार वेळा आमदार राहिले आहेत. 2006 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी ते अण्णाद्रमुकमध्ये होते. 2018 मध्ये ते द्रमुकमध्ये शामिल झाले. एआयएडीएमकेमध्ये असताना सेंथिल लाइमलाइटमध्ये असायचे. जयललिता यांच्या स्मरणार्थ ते पूजा करायचे. त्याच्या समर्थनार्थ सेंथिल यांनी मुंडनही केले होते. 2013 मध्ये त्यांनी अम्मा वॉटरला प्रत्यक्षात आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. जयललिता यांच्या निधनानंतर ते व्हीके शशिकला यांच्या गटात सामील झाले. तेव्हापासून ते अण्णाद्रमुकपासून दूर जात गेले. ते तामिळनाडूतील करूर येथील आहेत. 27 मे रोजी आयकर विभागाने सेंथिल बालाजींच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी एजन्सीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा :

  1. Money Laundering Case : तामीळनाडूचे मंत्री सेंथील बालाजींना ईडी कोठडीत कोसळले रडू, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल
  2. Himanta Biswa Ram Madhav : मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जहालवाद्यांची मदत घेतली?, हेमंता बिस्वा, राम माधव यांच्यावर गंभीर आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.