ETV Bharat / bharat

Vande Bharat Train : नरेंद्र मोदींच्या हस्ते 'या' 5 नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन, जाणून घ्या

author img

By

Published : Jun 26, 2023, 5:46 PM IST

Vande Bharat Train
वंदे भारत एक्सप्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून 2 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय ते इतर 3 वंदे भारत ट्रेनला व्हर्चुअली हिरवा झेंडा दाखवतील.

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून 5 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. एकाच स्थानकावरून 5 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखविण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापैकी दोन गाड्यांना मोदी स्टेशनवर उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवतील, तर उर्वरित गाड्यांना व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवला जाईल. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राणी कमलापती रेल्वे स्थानकावर ठोस व्यवस्था करण्यात आली आहे. भोपाळ रेल्वे विभाग व्यवस्थापनाने रविवारपासून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 बंद केला आहे.

नरेंद्र मोदी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यापैकी दोन वंदे भारत ट्रेन मध्य प्रदेशात धावणार आहेत.
  • वंदे भारत ट्रेन भोपाळ ते इंदूर आणि जबलपूर ते भोपाळ दरम्यान धावेल, ज्याला पंतप्रधान 27 जूनला हिरवा झेंडा दाखवतील.
  • पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 1 एप्रिल रोजी भोपाळ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
  • या दोन नव्या गाड्यांनंतर मध्य प्रदेशातील वंदे भारत गाड्यांची संख्या 3 होईल.
  • पंतप्रधान मोदी पाटणा ते रांची दरम्यान वंदे भारत ट्रेनला डिजिटल हिरवा झेंडा दाखवतील.
  • पंतप्रधान मडगाव-मुंबई सीएसटी आणि धारवाड-केएसआर बेंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
  • या पाच नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर देशात वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या 23 होणार आहे.
  • आत्तापर्यंत गोवा, झारखंड आणि बिहारमध्ये एकही वंदे भारत ट्रेन चालू नव्हती.

मोदी वंदे भारत गाड्यांच्या प्रदर्शनाला भेट देतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी 10 वाजता भोपाळच्या राजा भोज विमानतळावर पोहोचतील. येथून ते सकाळी 10.15 वाजता हेलिकॉप्टरने बरकतुल्ला विद्यापीठात पोहोचतील. मोदी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून भोपाळ-इंदूर वंदे भारत आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून भोपाळ-जबलपूर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवतील. भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर देशभरात धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी याला भेट देणार आहेत.

रोड शो रद्द : भोपाळमध्ये होणारा पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक रोड शो रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींचा रोड शो रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे. सूत्रांनुसार, पीएमओची परवानगी नसल्यामुळे रोड शो रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या रोड शोसाठी पक्षाने 300 मीटरची परवानगी मागितली होती. पक्षाने रोड मॅपही पाठवला होता. दुसरे कारण हवामान असल्याचे सांगितले जात आहे. हवामान खात्याने चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

  1. Vande Metro : वंदे भारत नंतर आता धावणार वंदे मेट्रो! जाणून घ्या सर्वकाही
  2. Vande Bharat in Maharashtra: मुंबई-गोवा वंदे भारत २६ जूनपासून धावणार, मान्सूनमुळे वेगावर मर्यादा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.