ETV Bharat / bharat

Rahul Gandhi: पंतप्रधान मोदी स्वत:ला भारत समजायला लागले! संघ,भाजप म्हणजे देश नाही -राहुल गांधी

author img

By

Published : Mar 20, 2023, 9:24 PM IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमध्ये भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राहुल म्हणाले की, पंतप्रधान मोदी स्वत:ला संपूर्ण भारत समजू लागले आहेत. त्याचबरोबर त्यांनी संघावरही जोरदार प्रहार केला आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

वायनाड (केरळ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, 'भाजप, आरएसएस आणि पंतप्रधान मोदी स्वतःला संपूर्ण भारत समजतात. पंतप्रधान हे संपूर्ण भारत नसून, भारताचे नागरिकही आहेत. देशात 140 कोटी लोक आहेत आणि ते भाजप किंवा आरएसएस नाहीत हे भाजप आणि आरएसएस विसरले आहेत. भाजप, आरएसएस किंवा पंतप्रधानांवर टीका करणे किंवा हल्ला करणे हा भारतावरील हल्ला नाही असा टोलाही राहुल यांनी यावेळी लगावला आहे.

  • I am not scared of BJP, RSS or Police. No matter how many cases are filed against me or how many times you send Police to my home & insult me, I will still fight for the truth. Those who always lie won’t be able to understand honest people: Congress MP Rahul Gandhi pic.twitter.com/sMbqqq22NO

    — ANI (@ANI) March 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माझ्यावर अनेक गुन्हेही दाखल केले जात आहेत : काँग्रेस नेते राहुल गांधी येथे आजोजीत जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राहुल म्हणाले माझ्यावर वारंवार होणारे राजकीय हल्ले, पोलीस माझ्या घरी पाठवले जात आहेत, तसेच, माझ्यावर अनेक गुन्हेही दाखल केले जात आहेत. परंतु, याला मी घाबरत नसून माझा सत्यावर विश्वास आहे असही ते म्हणाले आहेत.

भारत जोडो यात्रा : 'महिलांवर अजूनही लैंगिक अत्याचार होत आहेत' या त्यांच्या विधानाबाबत काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान रविवारी दिल्ली पोलिसांचे एक पथक राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले होते. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी राहुल यांनी ही टिप्पणी केली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्यांचे वाटप केले आहे.

मी त्यांना अजिबात घाबरत नाही : हे मला घाबरवू शकत नाहीत. 'बरेच लोक पंतप्रधान, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पोलिसांना घाबरत असतील, पण मी घाबरत नाही. मी त्यांना अजिबात घाबरत नाही आणि हीच त्यांची समस्या आहे. मी का घाबरत नाही हा त्याचा प्रश्न आहे. कारण मी सत्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे याला मी कधीच घाबरणार नाही.

मी फक्त सत्याच्याच बाजून उभा आहे : 'माझ्यावर किती हल्ले झाले, माझ्या घरी किती वेळा पोलीस पाठवले गेले किंवा माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले याने काही फरक पडत नाही, मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा आहे. मी फक्त सत्याच्याच बाजून उभा आहे असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : महिलांसाठी या राज्यात आता मासिक सहाय्य योजना, महिन्याला मिळणार 1000 रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.