ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा; विमानतळासह 11 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं करणार उद्धाटन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 11:30 AM IST

Updated : Dec 29, 2023, 11:46 AM IST

पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा
पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा

PM Modi Ayodhya Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अयोध्या आणि आसपासच्या प्रदेशासाठी तब्बल 11 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यावेळी ते सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत रेल्वेंनाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

अयोध्या PM Modi Ayodhya Tour : पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अयोध्येतील नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. या दौऱ्यात पंतप्रधान अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळ, रामपथ, जन्मभूमी मार्गासह अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकच्या नवीन इमारतींचं उद्धाटन करणार आहेत.

  • Prime Minister @narendramodi to visit #Ayodhya on 30th December

    💠PM to inaugurate, delicate to nation and lay the foundation stone of multiple development projects worth more than Rs 11,100 crore to revamp civic facilities and develop world class infrastructure in Ayodhya

    💠PM…

    — PIB India (@PIB_India) December 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात 15 हजार 700 कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्धाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करणार आहेत. तसंच दोन नवीन अमृत भारत ट्रेन आणि सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यासह इतर अनेक रेल्वे प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यानंतर दुपारी 12.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते नव्यानं बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. या विमानतळाला आता 'महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ' असं नाव देण्यात आलंय. पंतप्रधान दुपारी 1 वाजता एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते राज्यातील 15 हजार 700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यात अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4,600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

240 कोटी रुपयांचं अयोध्या धाम रेल्वे स्थानक : पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पहिल्या टप्प्यात 240 कोटी रुपयांहून अधिक खर्च करुन ते विकसित करण्यात आलंय. यात तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानक इमारत, लिफ्ट, एस्केलेटर, फूड प्लाझा, पूजा साहित्याची दुकानं, घड्याळ कक्ष, बाल संगोपन कक्ष, वेटिंग हॉल अशा सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. या रेल्वे स्थानकाची इमारत 'सर्वांसाठी प्रवेशयोग्य' आणि IGBC प्रमाणित 'ग्रीन स्टेशन इमारत' असणार आहे.

अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वेंना दाखवणार हिरवा झेंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अयोध्या दौऱ्यात दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये दरभंगा-अयोध्या-आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस आणि मालदा टाउन-सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस (बंगळुरु) अमृत भारत एक्सप्रेस या दोन नवीन अमृत भारत रेल्वेंचा समावेश आहे. तर श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बंगळुरु कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस, मंगलोर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस सहा वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत चोख सुरक्षा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 डिसेंबरच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केलाय. संसदेत घडलेल्या घटनेनंतर इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. अयोध्येत NSG, ATS, STF कमांडो टिम तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्व यंत्रणांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विशेष डीजी प्रशांत कुमार म्हणाले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. यासाठी तीन डीआयजी, 17 एसपी, 40 एएसपी, 82 डेप्युटी एसपी, 90 इन्स्पेक्टर, 325 सब इन्स्पेक्टर, 33 महिला एसआय, दोन हजार कॉन्स्टेबल, 450 ट्रॅफिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

  1. अयोध्या विमानतळाच्या नावात बदल; 'महर्षी वाल्मिकी' म्हणून ओळखले जाणार
  2. योगींच्या इच्छेनुसार अयोध्या रेल्वे स्टेशनचं नाव बदललं, मोदींच्या हस्ते उद्घाटन
Last Updated :Dec 29, 2023, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.