ETV Bharat / bharat

Parliament Special Session : रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा गरीब मुलगा संसदेत पोहोचला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 11:48 AM IST

Updated : Sep 18, 2023, 12:29 PM IST

Parliament Special Session : आजपासून संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. आज जुन्या संसद भवनात अधिवेशन होणार असून, उद्या नव्या संसदेत प्रवेश केला जाईल.

Narendra Modi
नरेंद्र मोदी

नवी दिल्ली Parliament Special Session : संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं. विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चंद्रयान ३ आणि जी २० च्या यशाचा उल्लेख केला. चंद्रावरील शिवशक्ती पॉइंट नवीन प्रेरणा केंद्र बनलं आहे, असं ते म्हणाले.

  • #WATCH | Special Session of the Parliament | Prime Minister Narendra Modi says, "...The echoes of Pandit Nehru's "At the stroke of the midnight..." in this House will keep inspiring us. In this House itself, Atal ji had said, "Sarkarein aayegi-jaayegi, partiyan banegi-bigdegi,… pic.twitter.com/MdYI4p6MfC

    — ANI (@ANI) September 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जुनी इमारत भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहील : त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित केलं. नवीन सभागृहात जाण्यापूर्वी येथील प्रेरणादायी क्षण आठवून पुढं जाण्याची ही संधी असल्याचं ते म्हणाले. 'हे खरं आहे की, ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता. मात्र आपण अभिमानानं सांगू शकतो की या वास्तूच्या उभारणीत देशवासीयांनी घाम, मेहनत आणि पैसा गुंतवला', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. '७५ वर्षांच्या प्रवासात या इमारतीनं अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले. आपण नवीन इमारतीत जात आहोत, परंतु जुनी इमारत भविष्यातील पिढ्यांना कायमच प्रेरणा देत राहील', असं मोदी म्हणाले.

  • #WATCH | Special Session of the Parliament | Prime Minister Narendra Modi says "Many MPs attended the session despite health issues. During the COVID-19 crisis, our MPs attended the proceedings of both of the Houses and performed their duties...With the feeling that India's… pic.twitter.com/D61LRCEEXU

    — ANI (@ANI) September 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गरीब मुलगा संसदेत पोहोचला : यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील त्यांच्या आठवणींचा उल्लेख केला. 'जेव्हा मी पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हा या लोकशाहीच्या मंदिरात डोकं टेकवून प्रवेश केला होता. आज रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा एक गरीब मुलगा संसदेत पोहोचला. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. देश मला इतके आशीर्वाद देईल आणि माझ्यावर इतके प्रेम करेल याची मी कल्पनाही केली नव्हती, असं मोदी म्हणाले.

  • #WATCH | Special Session of Parliament | In Lok Sabha, PM Modi says, "There was a terror attack (on the Parliament). This was not an attack on a building. In a way, it was an attack on the mother of democracy, on our living soul. The country can never forget that incident. I also… pic.twitter.com/QL4RN09BM9

    — ANI (@ANI) September 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना काळातही काम थांबू दिलं नाही : सभागृहातील सदस्यांना उद्देशून पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना काळातही आपण देशाचं काम थांबू दिलं नाही. आपण मास्क घालून आलो. तसेच सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं. सदस्यांची सभागृहाशी असलेलं नातं आपण पाहिलं आहे. पूर्वी येथे काम केलेला जुना सदस्य नक्कीच सभागृहाच्या सेंट्रल हॉलमध्ये येतो, असं मोदी म्हणाले. या सदनाला निरोप देणं हा खूप भावनिक क्षण आहे. एखादं कुटुंब जुनं घर सोडून नवीन घरात गेलं तर अनेक आठवणींनी भारावून जातं. हे सदन सोडताना देखील असंच मन भरून येतंय. या सदनाशी अनेक आंबट-गोड क्षण, भांडणं निगडीत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • #WATCH | Special Session of the Parliament | Prime Minister Narendra Modi says "Bidding goodbye to this building is an emotional moment...Many bitter-sweet memories have been associated with it. We have all witnessed differences and disputes in the Parliament but at the same… pic.twitter.com/dWN87wWAJs

    — ANI (@ANI) September 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२०४७ पर्यंत देशाला विकसित बनवायचंय : 'हे अधिवेशन छोटं असले तरी काळाच्या दृष्टीनं खूप मोठं आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचं अधिवेशन आहे. या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचा ७५ वर्षांचा प्रवास आता एका नव्या ठिकाणाहून सुरू होत आहे. हा प्रेरणादायी क्षण आहे. आता नव्या संकल्पानं, नव्या आत्मविश्वासानं २०४७ पर्यंत देशाला विकसित बनवायचंय', असं मोदी म्हणाले.

  • #WATCH | Special Session of Parliament | In Lok Sabha, PM Modi says, "India will be proud that when it was the president (of the G20), the African Union became its member. I cannot forget the emotional moment that when the announcement was made, African Union President said that… pic.twitter.com/ANf7gMIK4H

    — ANI (@ANI) September 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संसदेवरील हल्ला देश कधीही विसरणार नाही : संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला फक्त एका इमारतीवर झाला नाही, तर तो लोकशाहीच्या जननीवर, आत्म्यावर झाला होता. ती घटना हा देश कधीही विसरू शकत नाही. पण ज्यांनी सभागृह आणि सदस्यांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी लढताना छातीवर गोळी झेलली त्यांनाही मी सलाम करतो, असं मोदी म्हणाले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी पत्रकारांचीही आठवण काढली. देशात असे काही पत्रकार आहेत ज्यांनी आयुष्यभर संसद कव्हर केली. त्यांनी प्रत्येक क्षणाची माहिती देशापर्यंत पोहोचवली आहे. संसद कव्हर करणाऱ्या पत्रकारांची नावं माहीत नसतील, पण त्यांचं योगदान विसरता येणार नाही, असं ते म्हणाले.

हे सभागृह आणीबाणीचं साक्षी होतं : १९६५ च्या युद्धात लाल बहादूर शास्त्री यांनी या सदनातून देशातील शूर सैनिकांना प्रेरणा दिली होती. हरितक्रांतीचा पायाही याच सभागृहातून रचला गेला. इंदिरा गांधींनीही येथूनचं बांगलादेशचं स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे सभागृह आणीबाणीचीही साक्ष देतं. पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी ग्रामीण मंत्रालयाची स्थापना याच सभागृहातून केली होती, असं मोदींनी सांगितलं.

सभागृहाच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवण्यात आल्या : अटलजींचं सरकारही याच सभागृहाचं देणं आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारचा कॅश फॉर व्होट घोटाळाही या सभागृहात पाहायला मिळाला. या सभागृहाच्या माध्यमातून अनेक समस्याही सोडवण्यात आल्या. या सभागृहात कलम ३७० वरही ठराव करण्यात आला. जीएसटी, वन रँक वन पेन्शन, गरिबांसाठी १० टक्के आरक्षण हेही या सभागृहात झालं. भारताच्या लोकशाहीत आपण अनेक चढउतार पाहिले आहेत. हे सभागृह लोकशाहीचं बलस्थान आहे. हे तेच सभागृह आहे, जिथे ४ खासदार असलेला पक्ष सत्तेत राहायचा, तर १०० खासदार असलेला पक्ष विरोधात राहायचा, असं मोदी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Parliament Special Session २०२३ : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवसाचा प्लॅन
Last Updated :Sep 18, 2023, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.