ETV Bharat / bharat

Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन प्रचंड गदारोळ; लोकसभेसह राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब

author img

By

Published : Aug 4, 2023, 12:53 PM IST

Updated : Aug 4, 2023, 1:11 PM IST

Parliament Monsoon Session 2023
संग्रहित छायाचित्र

संसदेचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे चांगलेच वादळी ठरले. विरोधकांनी मणिपूर प्रकरणावरुन सत्ताधारींना घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे लोकसभा आणि राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारावरुन मोठा गदारोळ केला आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांनी मणिपूर प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करण्यासाठी सकाळपासूनच मोठा गदारोळ केला आहे.

भाजपच्या खासदारांना व्हिप : भाजपने आपल्या खासदारांना व्हिप बजावला असून तीन दिवस सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आदेश भाजप खासदारांना देण्यात आले आहेत. भाजपने 7 ते 11 ऑगस्टपर्यंत खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार दिल्ली सरकार विरोधातील विधेयक संसदेत मांडणार असल्याच्या चर्चा आहेत.

  • #WATCH | Delhi: On Opposition, Union Minister Anurag Thakur says, "...On the Delhi Bill, they could not put their stance forward. It was clear that till now the Opposition has only worked to eyewash the people of the country. They have wasted the time and money of the country. It… pic.twitter.com/hPHoWFfAj3

    — ANI (@ANI) August 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरोधकांची पार पडली बैठक : विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक घेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील रणनीती ठरवल्याची चर्चा आहे. इंडियाच्या सगळ्या घटक पक्षाचे खासदार या बैठकीत सहभागी झाले होते. दुसरीकडे बीआरएसच्या खासदारांनी मणिपूर प्रकरणावरुन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे आंदोलन केले.

  • Bharatiya Janata Party issues three-line whip to its Lok Sabha MPs from 7th August to 11th August to be present in the House and support Government's stand and bills. pic.twitter.com/GtOttbESw8

    — ANI (@ANI) August 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरोधकांनी देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवला : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मोठा गदारोळ केल्याने सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विरोधकांनी देशातील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप केला आहे. विरोधक मणिपूर प्रकरणावरुन फक्त आरोप करत असून चर्चेपासून पळ काढत आहेत. विरोधकांना गदारोळ करायचा हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट झाले होते. त्यामुळे विरोधकांनी देशाचा पैसा आणि वेळ वाया घातल्याचा हल्लाबोलही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी केला.

हेही वाचा -

  1. New parliament, old woes: नवी संसद, समस्या मात्र जुन्याच; पावसाळी अधिवेशनात अदानी मुद्यावरच संसदेत सामना रंगणार
  2. Parliament Monsoon Session 2023 : ऑफशोर मिनरल्स (विकास आणि नियमन) दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर, सभागृह उद्यापर्यंत तहकूब
Last Updated :Aug 4, 2023, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.