ETV Bharat / bharat

IND vs PAK : पाकिस्तानला मोठा झटका; 'हा' वेगवान गोलंदाज भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर

author img

By

Published : Sep 3, 2022, 7:41 PM IST

PAK
पाक

साइड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज भारताविरुद्धच्या आशिया कप सुपर-4 ( Asia Cup 2022 Super-4 ) सामन्यातून बाहेर पडला आहे. शुक्रवारी शारजाहमध्ये हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली.

दुबई: रविवारी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी दुखापतीमुळे सुपर-4 मध्ये टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर ( Shahnawaz Dahani out of match against India ) पडला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाझ दहनी दुखापतीमुळे आशिया चषक 2022 च्या सुपर 4 फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. हा वेगवान गोलंदाज साइड स्ट्रेनमुळे या सामन्याला मुकणार आहे. तसेच पुढील 2-3 दिवस वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल.

आशिया चषक 2022 ( Asia Cup 2022 ) च्या भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीची ( Pakistan fast bowler Shahnawaz Dahani ) दुखापत ही पाकिस्तानसाठी चांगली बातमी नाही. दहाणी 2 सप्टेंबर रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती.

पीसीबीने एका निवेदनात ( Statement by PCB ) म्हटले आहे की, "शहनवाज दहानी रविवारी भारताविरुद्धच्या आशिया कप सुपर-4 सामन्यासाठी साईड स्ट्रेनच्या संदिग्धतेमुळे ( Side strain injury to Shahnawaz Dahani ) उपलब्ध होणार नाही." शुक्रवारी शारजाहमध्ये हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती.

पीसीबीने पुढे सांगितले की, "कोणत्याही संदिग्ध साइड स्ट्रेनच्या दुखापतीप्रमाणेच, वैद्यकीय पथक पुढील 48-72 तास त्यांचे निरीक्षण करेल, त्यानंतर ते स्कॅन आणि स्पर्धेत पुढील सहभागासह निर्णय घेतील." अनेक खेळाडू जखमी झाल्याने पाकिस्तान आधीच संकटात सापडला आहे. यापूर्वी शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले होते. हे दोन्ही खेळाडू स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच जखमी झाले होते.

हेही वाचा - Great player Brian Lara : महान खेळाडू ब्रायन लारा यांची सनरायझर्स हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.