ETV Bharat / bharat

पी. एस. श्रीधरन यांनी गोव्याच्या राज्यपाल पदाची घेतली शपथ

author img

By

Published : Jul 15, 2021, 8:26 PM IST

ऐतिहासिक, आणि पर्यटनदृष्ट्या गोव्याला जगात विशेष महत्त्व आहे. येथील सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करू, असे आवाहन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उपस्थितांना केले.

P S Sreedharan Pillai
P S Sreedharan Pillai

पणजी- पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी पणजी दोनापवाला येथील राजभवनात संपन्न झाला.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामात, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुदिनो, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तसेच अन्य खात्याचे मंत्रीही उपस्थित होते.

पी एस श्रीधरन
पी एस श्रीधरन

गोव्याची सामाजिक एकात्मता महत्वाची – पिल्लई

ऐतिहासिक, आणि पर्यटनदृष्ट्या गोव्याला जगात विशेष महत्त्व आहे. येथील सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करू, असे आवाहन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उपस्थितांना केले.

नुकतेच केंद्र सरकारने मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करत ८ राज्यांमध्ये नविन राज्यपालांची नेमणूक केली आहे. यात गोवा राज्याच्या राज्यपालपदी पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची नेमणूक करण्यात आली आहे. श्रीधरन पिल्लई हे मिझोरामचे राज्यपाल होते. आता ते गोव्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत. पिल्लई यांच्या जागेवर हरि बाबू कंभमपती याची नियुक्ती मिझोरामच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे.

हेही वाचा-कमलनाथ काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष होणार?

कोण आहे पी. एस. श्रीधरन पिल्लई -

पी. एस श्रीधनरन पिल्लई यांचा जन्म केरळ जिल्ह्यातील अलाप्पुझा जिह्यात झाला. त्यांच्या आईचे नाव भवानी अम्मा तर वडिलांचे नाव सुकुमारन नायर. त्यांनी 1984 मध्ये काझिकोड कालीकट न्यायालयात वकिली केली आहे. यादरम्यान, त्यांनी अॅड रिठा यांच्याशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव अर्जुन श्रीधर असे आहे. अर्जुन श्रीधर हे केरळ उच्च न्यायालयात वकिली करतात.

हेही वाचा-झाडू मारणारी सफाई कर्मचारी झाली प्रशासकीय अधिकारी; ही जिद्द पहाच!

पी. एस श्रीधरन पिल्लई यांनी भूषवलेली पदे -

  • राज्य संयोजक, लोक तांत्रिक युवा मोर्चा
  • लोक संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी संघटनेचे नेते (आणीबाणी विरोधी आंदोलन)
  • जिल्हाध्यक्ष, प्रदेश सचिव - युवा मोर्चा ( 1980)
  • अध्यक्ष, बार असोसिएशन, कोझिकोड (1995 )
  • भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य
  • लक्षद्वीपसाठी भाजप प्रभारी
  • जिल्हाध्यक्ष (केरळ राज्य भाजप)
  • राज्य सचिव (केरळ राज्य भाजप)
  • राज्य सरचिटणीस (केरळ राज्य भाजप)
  • उपाध्यक्ष आणि प्रवक्ता (केरळ राज्य भाजप)
  • अध्यक्ष (केरळ राज्य भाजप 2003-06 आणि 2018-19)

हेही वाचा-अजब माकडाची गजब कहाणी... दारुच्या दुकानात जाऊन केले हे कृत्य

श्रीधरन पिल्लई यांनी राजकीय सुरूवात एबीव्हीपीच्या माध्यमातून झाली. ते 1978 मध्ये एबीव्हीपीचे राज्य सचिव होते. त्याआधी त्यांनी कॉलेजच्या दिवसात एबीव्हीपीचे काम देखील केले आहे. त्यानंतर त्यांनी काझिकोड जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष म्हणून काम केले. सी. के पद्मनबन यांच्यानंतर ते केरळ राज्याचे भाजप अध्यक्ष झाले. 2003 ते 2006 पर्यंत त्यांनी हे काम पाहिले. यानंतर त्यांनी अनेक पदे भूषवली. 25 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांची नियुक्ती मिझोरामच्या राज्यपालपदी करण्यात आली. त्यांनी मिझारोमचे 15वे राज्यपाल म्हणून काम पाहिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.