ETV Bharat / bharat

Modi Vs All : भाजपविरोधात एकजूट होणाऱ्या विरोधी पक्षांना एकत्र येण्यात काय आहेत अडचणी, जाणून घ्या आहेत समस्या

author img

By

Published : Jun 23, 2023, 10:26 AM IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र विरोधकांच्या ऐक्यात अनेक अडचणी आहेत. एकीकडे राज्यांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहणारे पक्ष लोकसभेसाठी एकाच व्यासपीठावर एकमत होऊ शकतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

विरोधी पक्षांना एकत्र येण्यात काय आहेत अडचणी
विरोधी पक्षांना एकत्र येण्यात काय आहेत अडचणी

विरोधी पक्षांना एकत्र येण्यात काय आहेत अडचणी

पाटणा: आज पाटणा येथे होणाऱ्या भाजप विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत मोदीविरुद्ध सर्व असे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान भाजप आणि मोदींविरुद्धात एकमूठ बांधणारे हे सर्व विरोधी पक्ष मात्र आप-आपल्याला राज्यात एकमेकांच्या विरुद्धात दंड थोपटत असतात. त्यामुळे विरोधी पक्ष एकतेच्या मंचावर बसतील का,असा प्रश्न निर्माण होत आहे. विरोधी ऐक्याचा चेहरा कोण?, किमान समान कार्यक्रम होईल का? टीएमसी, काँग्रेस, आप आणि सपा हे पक्ष एकमेकांशी समेट करू शकतील का? त्याचबरोबर सीट वाटप हे सर्वात मोठे आव्हान बनू शकते. त्यापेक्षा काँग्रेस इतरांना जागा देणार का? असे अनेक प्रश्न विरोधकांसमोर आहेत.

विरोधी एकजुटीचा चेहरा कोण?: भाजपने वर्ष 2014 पासून देशातील लोकसभा निवडणुका मोदींच्या चेहऱ्याच्या नावावर जिंकल्या जात आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये एकट्या हिंदी हार्टलँडमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने जवळपास 50 टक्के मतांसह 141 जागा जिंकल्या. अशात भाजप आणि मोदी विरुद्धात लढा उभारताना विरोधी पक्षांना आपला नेता निवडावा लागणार आहे. परंतु विरोधी पक्षातील नेत्यांची महत्त्वाकांक्षा जास्त आहेत. त्यामुळे ते एका व्यक्तीचा चेहरा नेतृत्व म्हणून मान्य करतील का? कारण काँग्रेस पक्षाचाही स्वतःचा अजेंडा आहे. जिथे काँग्रेस पक्षाला राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे. तर दुसरीकडे बंगालच्या पंचायत निवडणुकीत हिंसाचार थांबवण्याच्या अजेंड्यावर चर्चा व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर जेडीयूही आपल्या अजेंड्यावर काम करत आहे. राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पराभव करायचा असेल तर संपूर्ण विरोधकांनी भाजपविरोधात एक उमेदवार द्यावा, अशी नितीशकुमारांची इच्छा आहे.

एक समान किमान कार्यक्रम असेल का? : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वीच सांगितले होते की, नरेंद्र मोदी सरकारला पर्याय देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना समान किमान कार्यक्रमाच्या आधारे एकजुटीसाठी राजी करू. पण आता यावरही एकमत नसल्याचे दिसत आहे. बिहार सरकारचे मंत्री विजय कुमार चौधरी यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या असा कार्यक्रम आयोजित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

विरोधाभास होतील : विरोधी पक्षांमधील विरोधाभास दूर करणे सोपे नाही. केंद्राने काढलेल्या अध्यादेशामुळे दिल्ली सरकारचे बहुतांश अधिकार संपुष्टात आले आहेत. 'आप'ला या मुद्द्यावर विरोधकांचा पाठिंबा हवा आहे. त्याचबरोबर काँग्रेस या मुद्द्यावर उघडपणे बोलण्यास टाळत आहे. दुसरीकडे, समाजवादी पक्ष आणि ममता यांच्या टीएमसीमध्ये समन्वय साधणे कठीण आहे. दरम्यान टीएमसी, काँग्रेस, आप आणि सपा यांसारखे पक्ष एकमेकांशी समेट घडवून आणतील अशी आशा कमी आहे. सर्व पक्षांना एकमेकांविरुद्ध लढण्याचा इतिहास आहे. या पक्षांना युतीचे वाईट अनुभव आले आहेत.

ताळमेळ नाही : गेल्या वर्षी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवारावर एकमत होण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. परंतु त्यांना काँग्रेसकडून पाठिंबा मिळाला नाही. तर दुसरीकडे आप पक्ष केवळ काँग्रेसची मते आपल्या खात्यात आणून आपली ओळख मोठ्या प्रमाणात प्रस्थापित करू शकला आहे. त्याचबरोबर अखिलेश यादव यांचा काँग्रेससोबतच्या आघाडीचा अनुभव चांगला नाही. इतकेच काय सावकरांविषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी शरद पवार यांनीही त्यांच्या विधनाशी सहमत नसल्याचे म्हटले होते.

जागावाटप कशी होणार : काँग्रेसच्या TMC आणि AAPसोबतच्या संबंधांचा इतिहास पाहता दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये हे एकत्र येणे हे मोठे आव्हानापेक्षा कमी नाही. तसेच झारखंड, केरळ आणि यूपीसारख्या राज्यांमध्येही जागावाटपाचा मुद्दा अडकू शकतो. या राज्यांमध्ये एकूण 130 जागा आहेत. याशिवाय ओडिशा आणि तेलंगणासारख्या राज्यांमध्ये परिस्थिती स्पष्ट नाही. या दोन राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि नितीश यांच्यापासून दुरावले आहेत. या राज्यांमध्येही भाजपची पकड मजबूत होऊ देणार नाही. लोकसभेच्या जागेविषयी विचार केला तर उत्तर प्रदेशात 80, महाराष्ट्रात 48, बंगालमध्ये 42, बिहारमध्ये 40, तामिळनाडूमध्ये 39, पंजाबमध्ये 13, केरळमध्ये 20, हरियाणामध्ये 10, झारखंडमध्ये 14, दिल्लीमध्ये 7 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 5 जागा आहेत. या राज्यांमध्ये भाजप प्लसकडे एकूण 162 जागा आहेत. आता काँग्रेस इतर पक्षांना स्थान देणार का, हाही प्रश्न येथे उपस्थित होत आहे. कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसचा हा विश्वास अधिक दृढ झाला आहे. दरम्यान या सर्वा मुद्द्यावर आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी आपल्यी प्रतिक्रिया दिली आहे.

'अरविंद केजरीवाल यांनी संविधानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. याचा विचार करणे आवश्यक आहे. पंतप्रधानपदासाठी एचडी देवेगौडा, इंदर कुमार गुजराल आणि चौधरी चरणसिंग यांची नावे प्रथम आली का? निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवू.- आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह

"महाआघाडीत कोणताही वाद नाही. नेते एकाच व्यासपीठावर बसल्यावर सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल आणि अजेंडाही ठरवला जाईल." - राजेश राठोड, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस पक्ष

हेही वाचा -

  1. Patna Opposition Meeting : भाजपविरोधी पक्षांची नितीश कुमारांच्या निवासस्थानी आज बैठक; फुंकणार भाजपच्या पराभावाचे रणशिंग
  2. PM Modi Speech : भारताचा तिरंगा आणि अमेरिकेचा ध्वज आकाशात उंच फडकत राहो, पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमधील भाषण गाजले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.