केंद्र सरकार लवकरच फ्लेक्स इंजिन पॉलिसी आणणार - नितीन गडकरी

author img

By

Published : Sep 13, 2021, 6:27 PM IST

Updated : Sep 13, 2021, 8:15 PM IST

नितीन गडकरी

देशातील शेतकरी गहु, तांदळासह पेट्रोल-डिझेलचेही उत्पादन करू शकणार आहेत. मिक्स फ्लेक्स इंजिन पॉलिसी अमेरिका, ब्राझील आणि कॅनडामध्ये लागू आहे. त्या पद्धतीने आपल्याकडे हे धोरण आणण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

जयपूर- केंद्र सरकार लवकरच फ्लेक्स इंजिन पॉलिसी आणणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते सोमवारी राजस्थानच्या विधानसभेत आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की देशातील वाहन चालकांकडे वाहन पेट्रोलने चालवावे की 100 टक्के इथेनॉल इंधनने चालवावे, यासाठी पर्याय असणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार फ्लेक्स इंजिन पॉलिसी आणणार आहे. संसदीय व्यवस्था आणि लोकांच्या अपेक्षा या विषयावरील चर्चासत्रात नितीन गडकरी बोलत होते.

हेही वाचा-JEE Mains Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल आज जाहीर होऊ शकतो

देशातील शेतकरी धान्यासह इंधनाचे उत्पादनही करू शकणार

देशातील शेतकरी गहु, तांदळासह पेट्रोल-डिझेलचेही उत्पादन करू शकणार आहेत. देशातील शेतकरी धान्यासह इंधनाचे उत्पादनही करू शकणार आहेत. मिक्स फ्लेक्स इंजिन पॉलिसी अमेरिका, ब्राझील आणि कॅनडामध्ये लागू आहे. त्या पद्धतीने आपल्याकडे हे धोरण आणण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

हेही वाचा-नीट परीक्षेला तामिळनाडू सरकारचा विरोध; बारावीच्या गुणांवरच वैद्यकीय अभ्यासक्रमाचे देणार प्रवेश

देशाच्या हिश्शाच्या पाणी जाते पाकिस्तानात

कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, की काही राज्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. राजस्थानसह कर्नाटक, गुजरात, तेलंगाणा, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. जोपर्यंत 50 टक्के सुपर जलसिंचन होत नाही, तोपर्यंत देशात पूर्णपणे शेतकरी आत्मनिर्भर आणि संपन्न होऊ शकणार नाही.

हेही वाचा-योगी सरकारच्या जाहिरातीसह धार्मिक टिप्पणीवर काँग्रेसने साधला निशाणा

देशात पाण्याच्या नियोजनाची कमतरता-

पुढे गडकरी म्हणाले, की जलसंपदा मंत्री असताना काही राज्यांमधील जुने वाद सोडविले आहेत. भारतामधील 3 नद्यांचे पाणी पाकिस्तानात जाते. मात्र, पंजाब आणि हरियाणा हे आपआपसात पाण्यासाठी वाद करतात. गावातील पाणी गावात, शेतातील पाणी शेतात आणि शहरातील पाणी शेतात अडविण्याची गरज यावेळी गडकरींनी व्यक्त केली. आपल्या देशात पाण्याची कमतरता नाही. तर नियोजनाची कमतरता आहे. त्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे.

Last Updated :Sep 13, 2021, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.