ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातही नक्षली हिंसा, आयईडी स्फोटात एक जवान शहीद

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 7:49 PM IST

Chhattisgarh Naxal Violence : शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. या टप्प्यातही हिंसाचाराच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. वाचा पूर्ण बातमी...

Chhattisgarh election
Chhattisgarh election

गरियाबंद (छत्तीसगड) Chhattisgarh Naxal Violence : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा संपला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्याप्रमाणे या टप्प्यातही राज्यात नक्षली हिंसाचार झाला.

आयईडी स्फोटात जवान शहीद : राज्यातील गरियाबंदमध्ये आयईडी स्फोटात एक आयटीबीपी (ITBP) जवान शहीद झालाय. नक्षलवाद्यांनी मतदानानंतर परतत असलेल्या सुरक्षा दलाला लक्ष्य करून आयईडी स्फोट घडवून आणला. या घटनेत हा जवान जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही नक्षलवादी हिंसाचारात एक जवान शहीद झाला होता.

मतदान अधिकाऱ्यांच्या टीमवर हल्ला : गरियाबंदच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. ही घटना बडे गोबरा गावाजवळ घडली. तेथे एक मतदान अधिकाऱ्यांची टीम सुरक्षा दलाच्या संरक्षणाखाली मतदान करून परतत होती. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात आयटीबीपीचा जवान हेड कॉन्स्टेबल जोगिंदर सिंग शहीद झाला. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय.

मतदानापूर्वीही आयईडी स्फोट झाला होता : मतदानापूर्वी गुरुवारी (१६ नोव्हेंबर) धमतरीच्या सिहावा येथे आयईडी स्फोट झाला होता. येथे एकूण दोन स्फोट झाले. मात्र हे दोन्ही स्फोट कमी तीव्रतेचे होते, त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. त्यानंतर पोलिसांनी परिसरातून पाच किलोचा आयईडीही जप्त केला. धमतरीचा सिहावा हा नक्षलग्रस्त भाग आहे.

पहिल्या टप्प्यात बस्तरमध्ये नक्षलवादी हिंसाचार : छत्तीसगड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बस्तरमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी हिंसाचार झाला होता. कांकेर, सुकमा, विजापूर आणि दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी निवडणुका उधळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात एक जवान शहीद झाला होता.

हेही वाचा :

  1. Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, अनेक ठिकाणी नक्षली चकमक
  2. Naxalite Killed Villagers : मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी केली तीन गावकऱ्यांची हत्या
  3. Manoj Tiwari : 'भाजपाशासित राज्यात गुन्हा केला तर याद राखा! पुढच्या सात पिढ्या...', मनोज तिवारींचा गंभीर इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.