ETV Bharat / bharat

Rahul Gandhi ED Enquiry : राहुल गांधी याची शुक्रवारी होणार ईडीकडून चौकशी; काँग्रेसचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

author img

By

Published : Jun 15, 2022, 7:58 AM IST

Updated : Jun 16, 2022, 6:46 AM IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची बुधवारी ईडीकडून चौकशी करण्यात आली. बुधवारी रात्री 9 वाजेपर्यंत त्यांची ईडीकडून चौकशी झाली. ( Congress Leader Rahul Gandhi ED Enquiry ) राहुल गांधी रात्री 9.30 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. चौकशीसाठी ते तिसऱ्यांदा ईडी कार्यालयात हजर झाले होते.

Rahul Gandhi
राहुल गांधी

नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी (दि. 15 जुन) सलग तिसऱ्या दिवशी ED'कडून चौकशी झाली आहे. सकाळी 11 वाजता ते चौकशीसाठी 'ED' कार्यालयात हजर झाले होते. दरम्यान, आज राहुल गांधी बुधवारी 9.30 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ( Congress Letter To Lok Sabha Speaker ) गेल्या तीन दिवसांत ईडीने सुमारे 27 तास राहुल यांची चौकशी केली आहे. आणखीही चौकशी होणार असून, राहुल गांधी यांना शुक्रवारी (दि. 17 जुन) रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून ईडीने राहुल गांधी यांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अधीर रंजन चोधरी यांनी पत्रात लिहिले आहे की, आमचे सहकारी राहुल गांधी यांची ईडीकडून सलग तीन दिवस चौकशी सुरू आहे. ( Congress Letter To Lok Sabha Speaker Against ED Action ) दररोज सुमारे 10 ते 11 तास चौकशी केली जात आहे. एका देशातील मोठ्या नेत्याला तसेच एका खासदाराला अशी वागणूक मिळणे अमानवी आहे. हे सगळे पाहता यामध्ये काही कट-कारस्थान असण्याची शक्यता आहे असे आम्हाला वाटते. तरी आपण यामध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

  • #WATCH | Delhi: Congress leader Rahul Gandhi arrives at the Enforcement Directorate (ED) office to appear for the third consecutive day of questioning in the National Herald case. pic.twitter.com/xxG3vwjMil

    — ANI (@ANI) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची ईडीकडून होत असलेल्या चौकशीबद्दल निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी कोरोनाची लागण झाल्याने हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनीया गांधी यांना फोन करून प्रकृतीची विचारपुस केली आहे. ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee ) ममता सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

  • #WATCH Congress leader Sachin Pilot detained by police amid protests by party workers over the questioning of Rahul Gandhi by the Enforcement Directorate in the National Herald case#Delhi pic.twitter.com/smlKTJ62hS

    — ANI (@ANI) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांच्याकडे अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या चौकशीवरून पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनेदरम्यान काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलीस गुंडगिरी करत आहेत. ( Congress leader Rahul Gandhi in National Herald case ) त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केली. हा गुन्हेगारी अतिक्रमण आहे. त्याची गुंडगिरी शिगेला पोहोचली आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही अहिंसावादी आहोत पण या गोष्टींचा हिशोब होणार असही ते म्हणाले आहेत.

  • #WATCH | Delhi: Congress workers outside the Enforcement Directorate office burn tires in protest to the ED probe against party leader Rahul Gandhi in the National Herald case. pic.twitter.com/eG3Qnq57oX

    — ANI (@ANI) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राहुल गांधी आंची होणारी ई़डी चोकशीवर ईडीची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'ED'चा अर्थ आता 'Examination In Democracy' असा झाला आहे. राजकारणात विरोधकांना या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. सरकार नापास झाल्यावर ही परीक्षा जाहीर करते. ज्यांची तयारी चांगली आहे, त्यांना ना लेखी-परीक्षेची भीती वाटते, ना तोंडी… आणि त्यांनी कधीही घाबरू नये. अस अखिलेश यादव म्हणाले आहेत.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण - नॅशनल हेराल्ड प्रकरण (2012)मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसच्या (2000)कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.

काल 'अशा'प्रकारे झाली चौकशी : राहुल गांधी यांना जेवणासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर राहुल हे सोनिया गांधी ज्या गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी आई सोनिया यांच्या तब्येतीची चौकशी केली. सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या कोरोनाच्या त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत. जेवनानंतर राहुल गांधी पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले. यामध्ये राहुल यांची आणखी चौकशी झाली.

२०१५ पासून जामिनावर - सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना या प्रकरणी लवकर सुनावणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले होते. 19 डिसेंबर 2015 रोजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. 2016 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिला आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली होती.

  • #WATCH कांग्रेस की महिला नेताओं और कार्यकर्ताओं ने दिल्ली में पार्टी कार्यालय के बाहर विरोध प्रदर्शन किया। नेशनल हेराल्ड मामले में राहुल गांधी आज लगातार तीसरे दिन ED के सामने पेश हो रहे हैं। pic.twitter.com/qTBBxifGNa

    — ANI_HindiNews (@AHindinews) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची चौकशी, काँग्रेस कार्यालयात पोलीस घुसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप

Last Updated :Jun 16, 2022, 6:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.