ETV Bharat / bharat

IPL 2022 Tournament: तपास यंत्रणांचे काही तासातच घुमजाव, आता म्हणाले आयपीएल स्पर्धेवर दहशतवादी सावट नाही

author img

By

Published : Mar 24, 2022, 7:45 PM IST

Sanjay Pandey
Sanjay Pandey

आयपीएल स्पर्धेवर दहशतवादी सावट ( Terrorist threat on IPL tournament ) असल्याचे समोर माहिती आली होती. त्यावर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, आयपीएल स्पर्धेला कोणताही धोका किंवा दहशतवादी सावट नाही. कारण याबाबत कोणत्याही दहशतवाद्याकडून किंवा दहशवादी संघटनेकडून अशी कोणतेही धमकी मिळालेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.

मुंबई: आयपीएलचा पंधरावा हंगाम ( Fifteenth season of IPL ) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच आता मुंबईतील वानखेडे स्टेडियम उडवून देण्याची धमकी आल्याने खळबळ माजली होती. मात्र मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक परिपत्रक काढून अशाप्रकारे कुठलीही धमकी मिळाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांनी देखील सोशल मीडियावर ट्विट करत ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. तसेच यावर कुणीही विश्वास ठेवू नका असे देखील म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलवर कोणत्याही प्रकारचे दहशतवाद्यी सावट नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आयपीएलबाबत कोणतीही धमकी मिळाली नसून, कोणत्याच दहशतवाद्यांनी ट्रायडेंट किंवा वानखेडेची रेकी केली नाही, असंही त्यांनी म्हटले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरात खेळवले जाणार आहेत. आयपीएल ही स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, अशी माहिती समोर आली होती. यानंतर क्रिकेटविश्वात एकच खळबळ माजली. परंतु, अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडेंटच ते वानखेडे स्टेडियमपर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपूट किंवा माहिती प्राप्त झालेली नाहीये, असं मुंबई पोलिसांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

अगोदर आयपीएल सामन्यांवर दहशतवाद्यांच्या सावटाची मिळाली होती माहिती- प्रसारमाध्यमांत येत असलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकानं एकाला अटक केल्याचं सांगण्यात आले होतो. तसेच अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडं चौकशी केली असता, त्याने वानखेडे स्टेडियम, नरिमन पॉईंटचे ट्रायडंट हॉटेल तसेच खेळाडूंचे हॉटेल ते स्टेडियमपर्यंतच्या मार्गाची रेकी केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर हॉटेल ते स्टेडियमच्या मार्गात पार्किंगलाही मनाई करण्यात आलीय. खेळाडूंसह सामनाधिकारी, पंच आणि इतर कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा देण्यात येणार आहे. तसेच पुढील धोका लक्षात घेता, बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले, असंही सांगण्यात आलं होतं.

26 तारखेपासून सुरुवातल आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात - आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. मुंबईच्या तीन स्डेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी 20 सामने वानखेडे स्डेडियमवर खेळले जातील. तर, ब्रेबॉन स्डेडियममध्ये 15 आणि डीव्हाय स्डेडियमवर 20 सामने खेळले जाणार आहे. इतर 15 सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्डेडियमवर होतील.




ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.