ETV Bharat / bharat

MP Accident : सीधी येथील अपघातात 14 ठार, 50 हून अधिक जखमी ; मुख्यमंत्र्यांनी केली नुकसानभरपाई आणि नोकरीची घोषणा

author img

By

Published : Feb 25, 2023, 6:41 AM IST

Updated : Feb 25, 2023, 10:55 AM IST

मध्य प्रदेशातील सीधी येथे शुक्रवारी मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले मुख्यमंत्री शिवराज यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

MP Sidhi Road accident
मध्य प्रदेशातील सीधी येथे अपघात

मध्य प्रदेशातील सीधी येथे अपघात

सीधी (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील सीधी येथे एका अनियंत्रित ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मोहनिया बोगद्याजवळ ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. जखमींची संख्या 50 पेक्षा अधिक आहे, तर 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीसाठी गेली होती. तेथून परतत असताना एका भरधाव ट्रकने तिला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बस जागीच पलटी झाली.

  • घटना हॄदयविदारक है। हमारी पहली प्राथमिकता है कि घायलों के उपचार की बेहतर व्यवस्था करें। आवश्यकता पड़ने पर घायलों को एयर एंबुलेंस द्वारा भी अन्यत्र उपचार हेतु ले जाएंगे।

    इस दुर्भाग्यपूर्ण दुर्घटना में जो साथी नहीं रहे, उनके परिजनों को ₹10 लाख की राहत राशि दी जाएगी।

    — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

असा झाला अपघात : सतना जिल्ह्यात आयोजित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सीधीहून अनेक जण आले होते. कार्यक्रम संपताच प्रवाशांना घेऊन आलेल्या बस सतनाहून परतत होत्या. बस सीधी जिल्ह्यातील मोहनिया बोगद्याजवळ पोहोचताच प्रवाशांना नाश्त्यासाठी बसेस थांबवण्यात आल्या. त्याचवेळी रेवाकडून येणाऱ्या ट्रकचा टायर फुटला, आणि ट्रकचे नियंत्रण सुटले. तो ट्रक बोगद्याजवळ उभ्या असलेल्या बसवर जाऊन धडकला. या धडकेमुळे तिथे उभ्या असलेल्या 3 बस एकामागून एक एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोकही घटनास्थळी जमा होत ते मदतकार्यात शामिल झाले. जखमींमध्ये सर्व प्रौढ आहेत.

मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले : घटनेनंतर लगेचच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा मृतांची स्थिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी येथे मदत कार्याबाबत निर्देश दिले. यानंतर ते दोघे जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी संजय गांधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे.

  • रीवा मेडिकल कॉलेज और संजय ग़ांधी अस्पताल में पहुंचकर शोकाकुल परिजनों को ढांढस बंधाया और घायलों के इलाज के संबंध में चिकित्सकों से जानकारी प्राप्त की।
    घायलों को सर्वोत्तम चिकित्सा सुविधाएं उपलब्ध कराई जा रही हैं। हमारे घायल भाई-बहन शीघ्र पूर्णत: स्वस्थ हों, यही प्रार्थना करता हूं। pic.twitter.com/7DUVFzOXxV

    — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मृतांच्या कुटुंबियांना नोकऱ्या मिळतील : मध्य प्रदेश सरकारने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि मध्यम जखमींना 1 लाख रुपये मदत मिळणार आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नोकरी देण्याचे आश्वासनही दिले आहे. ते म्हणाले की, 'मृत व्यक्तीच्या आश्रित नातेवाईकांना त्यांच्या पात्रतेनुसार शासकीय सेवेत घेतले जाईल.'

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'सीधी येथे बस उलटल्याने झालेल्या अपघाताबाबत अत्यंत दुःखद बातमी मिळाली. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या पावन चरणी स्थान देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. घटनास्थळी जिल्हाधिकारी, सीधी जिल्हा प्रशासन आणि एसपी उपस्थित आहेत. रेवा मेडिकल कॉलेज आणि सीधी जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचारासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगी राज्यातील जनता आणि शोकाकूल कुटुंबीयांच्या पाठीशी आहे'.

हेही वाचा : Chhattisgarh Accident : पिकअप आणि ट्रकच्या भीषण अपघातात 11 ठार, 10 हून अधिक जखमी

Last Updated :Feb 25, 2023, 10:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.