ETV Bharat / bharat

Jaya Bachchan Rajani Patil : रजनी पाटील यांना खुलासा करण्याची संधी दिली नाही - खासदार जया बच्चन

author img

By

Published : Feb 11, 2023, 11:05 AM IST

संसदेत गैरव्यवहाराच्या कारणावरून काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना शुक्रवारी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन म्हणाल्या की, पाटील यांना खुलासा करण्याची संधी देण्यात आली नाही.

Jaya Bachchan Rajani Patil
जया बच्चन रजनी पाटील

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, तिने जाणीवपूर्वक असे केले नसतानाही तिला इतकी कठोर शिक्षा देणे योग्य नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील असून मला न्याय मिळाला पाहिजे, असे पाटील म्हणाल्या. पाटील यांना अत्यंत अपमानास्पद पद्धतीने निलंबित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन म्हणाल्या की, 'काही चूक झाली असेल तर प्रकरण समितीकडे पाठवले पाहिजे'.

स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया : या घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, एखाद्या पुरुषाने नियम मोडला तर त्याला शिक्षा व्हायला हवी पण जर एखाद्या स्त्रीने नियम मोडला तर तिला वाचवले पाहिजे. हा कोणता न्याय आहे? राज्यसभा असो की लोकसभा, कायदे करण्यासाठी लोक खासदारांना निवडून देतात. त्यांचे पालन करण्याची अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून असते.

जगदीप धनखर यांची कठोर भूमिका : संसदेतील गैरव्यवहाराच्या कारणावरून काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. रजनी पाटील यांनी सभागृहाच्या आतून एक व्हिडिओ ट्विट केल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. व्हिडिओत विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभार प्रस्तावाला प्रतिसाद देत विरोध करताना दिसत होते. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. विशेषाधिकार समिती या प्रकरणाची चौकशी करणार असून जोपर्यंत समिती अहवाल देत नाही तोपर्यंत पाटील यांना निलंबित केले जाईल. संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी हे प्रकरण कोणत्याही बाहेरील एजन्सीकडे सोपवले जाणार नाही, असे धनखर म्हणाले.

आधी भाजप मध्ये होत्या : रजनी पाटील मुळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील आत्माराम पाटील स्वातंत्र्यसैनिक होते. राज्यात मंत्रिपद भूषविलेल्या अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्यांमध्ये रजनी पाटील यांचा समावेश होतो. १९९० ते ९६ या काळात बीड जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली होती. गोपीनाथ मुंडे यांनी पाटील यांना भाजपकडून बीड लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, जिकंल्यानंतर त्यांनी काही दिवसातच भाजपला रामराम केला होता. 1998 साली त्यांनी भाजपला सोडचीठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा : Sukesh Chandrasekhar Chahat Khanna : टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाच्या अडचणी वाढल्या, सुकेश चंद्रशेखरने पाठवली 100 कोटींची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.