Mother becomes a tomboy for Daughter : मुलीसाठी आई झाली वडील, 30 वर्षांपासून पुरुषासारखे राहणीमान

author img

By

Published : May 11, 2022, 8:40 PM IST

Mother becomes a tomboy for Daughter

मुदिवैथनेथल शिवा पिल्लईने ( Mudivaithnethal Shiva Pillai ) आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी मोलकरीण म्हणून काम करायला ( widow challenges ) सुरुवात केली. विधवा असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, मुलीला तिच्या वडिलांची उणीव ( mother like father for singal child ) भासली नाही. कारण, तिच्या आईने पुरुषासारखे कपडे घालण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी तिने नाव बदलून मुथू ठेवले.

तुतीकोरण ( चेन्नई ) - आई आपल्या मुलांसाठी किती त्याग करू ( mother sacrifice for children ) शकते, याला खरोखर मर्यादा नाही. तामिळनाडूमध्ये एका महिलेने 30 वर्षे पुरुषाप्रमाणे राहून मुलीचे ( single parenting by mother ) संगोपन केले. एवढेच नाही तर त्यासाठी स्वत:च्या वेशभूषेत आणि राहणीमानातही बदल केला ( woman like mans dress and lifestyle ) आहे.

मुदिवैथनेथल शिवा पिल्लई ही फक्त 20 वर्षांची होती. तेव्हा तिचे लग्न सोरकालिंगपुरम पेचियाम्मल यांच्याशी झाले होते. मात्र, पतीचे निधन झाल्याने त्यांचे वैवाहिक जीवन 15 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकले नाही.

मुथू हे नाव वापरण्यास सुरुवात- मुदिवैथनेथल शिवा पिल्लईने ( Mudivaithnethal Shiva Pillai ) आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी मोलकरीण म्हणून काम करायला ( widow challenges ) सुरुवात केली. विधवा असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, मुलीला तिच्या वडिलांची उणीव ( mother like father for single child ) भासली नाही. कारण, तिच्या आईने पुरुषासारखे कपडे घालण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी तिने नाव बदलून मुथू ठेवले. गरिबीमुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जावे लागले. स्त्री असूनही तिने स्वतःला एक पुरुष दाखविण्यास सुरुवात केली. याचमुळे तिला अण्णा (आदरणीय संज्ञा, मोठ्या भावाप्रमाणे उच्चारली जाते) म्हणून ओळखले जाऊ लागले.

30 वर्षांपासून आईबरोबर वडिलांची भूमिका- काही काळानंतर ती तुतीकोरीनला परत गेली. तिने पुरुषासारखे केस कापले. तिने पुरुषाप्रमाणे कपडे घालण्यास सुरुवात केली. ती गेल्या 30 वर्षांपासून आपल्या मुलीची आई आणि वडील म्हणून जगत आहे. ती चहाच्या टपऱ्यांवर काम करत होती तिची ओळख मुथू मास्टर अशी होती. गावात त्यांना मुथू मास्तर असेही म्हणतात. मुथू मास्टर आता ५७ वर्षांच्या आहेत.

100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन- तिने आपल्या मुलीचे लग्न ठरविले आहे. तिने सांगितले की मी 100 दिवसांच्या अॅक्शन प्लॅनमध्ये काम करत आहे. माझ्या मुलीच्या लग्नासाठी कमाई करण्यासाठी पेंटर म्हणूनही काम करत आहे. माझे वैवाहिक जीवन 15 दिवसात संपले. पण मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्या स्वाभिमानासाठी माझे स्वरूप बदलले आहे. या आयुष्यात मला कधीच चिंता किंवा पश्चाताप झाला नाही.

पेन्शन मिळाली तर मदत होईल- मुथ्थू मास्टर म्हणाले की, माझ्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सापडले नाही. आधार कार्डमध्ये त्याचे नाव मुथू आहे. त्यामुळे मला विधवा पेन्शन किंवा ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतन मिळत नाही. हा निधी मिळाल्यास मला खूप मदत होईल. मुलगी संगुमा सुंथारी म्हणाली की, माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे माझ्या आईने माझ्या वडिलांची भूमिका साकारली. या बदलाची मला खंत नाही. पेन्शन मिळाली तर तिच्यासाठी मोठी मदत होईल. अधिकाऱ्याने पेचियाम्मल यांच्या विनंतीकडे लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती असे संगुमाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.